जम्मूमध्ये सीमा ओलांडताना एका दहशतवाद्याचा मृत्यू, दुसऱ्याला अटक

दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. सीमेवर प्रवेश करताच जवानांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला, मात्र ते शरण येण्याऐवजी पळू लागले. त्यानंतर चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. त्याचवेळी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला जम्मूमध्येच अटक करण्यात आली आहे.

    श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याचा (Terrorist) बीएसएफने (BSF) खात्मा केला आहे. सोमवारी रात्री उशिरा अडीचच्या सुमारास घुसखोर जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा (LOC) ओलांडण्याचा प्रयत्न करत होते.

    दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. सीमेवर प्रवेश करताच जवानांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण (Surrender) करण्याचा इशारा दिला, मात्र ते शरण येण्याऐवजी पळू लागले. त्यानंतर चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. त्याचवेळी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला जम्मूमध्येच अटक करण्यात आली आहे.

    यापूर्वी राजौरी येथील एलओसीजवळ भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले. दहशतवाद्यांनी राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. सुरक्षा दल आणि तपास संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांना आर्थिक मदत रोखण्याच्या मोहिमेत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जवळपास आणखी २०० मालमत्तांची यादी तयार केली जात असून त्या लवकरच जप्त केल्या जातील. तपासात या संपत्तीचा अतिरेकी फंडिंगशी संबंध असल्याचे समोर आले आहे.