राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांची आज बैठक, नव्या नावावर बैठकीत होणार चर्चा

राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलै (presidential election 18 July 2022) रोजी होणार असल्यामुळं विरोधी पक्ष चांगलीच मोर्चे बांधणी करताना दिसत आहे. तसेच या निवडणुकीवरून देशाचे राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. याबाबत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांनी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु केलेत.

    नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाने (Election commission) देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा (presidential election) कार्यक्रम जाहीर केला आहे. पुढील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार 29 जूनपर्यंत अर्ज भरू शकतील. 30 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 2 जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी (Election Result) होणार आहे.

    दरम्यान, राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलै (presidential election 18 July 2022) रोजी होणार असल्यामुळं विरोधी पक्ष चांगलीच मोर्चे बांधणी करताना दिसत आहे. तसेच या निवडणुकीवरून देशाचे राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. याबाबत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांनी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु केलेत. याबाबतीत बॅनर्जी यांनी देशातील प्रमुख पक्ष्यांच्या नेत्यांना पत्र पाठवून बैठकीसाठी आमंत्रण दिले आहे. याच पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांनी 15 जूनला दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. (mamata banerjee delhi meeting)

    आज विरोधकांची बैठक होणार असून, या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा समावेश आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश आणि रणदीप सिंग सुरजेवाला, याशिवाय आरएलडी नेते जयंत चौधरी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आदी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी नावाची चर्चा होणार आहे.