aunty-skating-viral-video

एका महिलेने चक्क साडी नेसून स्केटिंग (Skating With Saree) केलं आहे. स्टेकिंग करताना तोल आणि संयम सांभाळणं खूप गरजेचं असतं. मात्र, या महिलेने चक्क साडी नेसून स्केटिंग खूप सहजपणे केलं आहे. या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video On Social Media)झाला आहे.

  साडी नेसून वेगवेगळे व्यायाम करणाऱ्या महिलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर(Viral) व्हायरल झाले आहेत. पुण्याच्या एका महिलेने साडी नेसून वर्कआऊट केला होता तर एका महिलेने घोडेस्वारी केली होती. आता एका महिलेने चक्क साडी नेसून स्केटिंग (Skating With Saree) केलं आहे. स्टेकिंग करताना तोल आणि संयम सांभाळणं खूप गरजेचं असतं. मात्र, या महिलेने चक्क साडी नेसून स्केटिंग खूप सहजपणे केलं आहे. या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video On Social Media)झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Aunty Skates (@auntyskates)


  सोशल मीडियावर चर्चेत असलेली ही महिला टोरंटोमध्ये राहणारी आहे. त्यांचं नाव ओर्बी रॉय असं आहे. विशेष म्हणजे वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी साडी नेसून स्केटींग करण्याचा धाडसी स्टंट केला आहे. ओर्बी यांनी आपल्या स्केटींगचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

  ओर्बी यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी auntyskates या इन्स्टाग्राम पेजच्या रिअलमध्ये शेअर केला होता. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.