आपले दुबळे सरकार आहे! सीमाप्रश्नी बोम्मईं आग लावताहेत; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शांत म्हणून बोम्मईंची जीभ चालते…संजय राऊतांचा हल्लाबोल

जसा कर्नाटकाने महाराष्ट्राच्या विरोधात ठराव केला, तसा महाराष्ट्र सरकारने देखील कर्नाटकच्या विरोधात ठराव करावा अशी मागणी राऊतांनी केली. आमचा सांस्कृतिक वाद नाही, अचनाक बोम्मईंनी वाद निर्माण केला आहे, अशी टिका राऊत यांनी मुख्यमंत्री बोम्मईंवर केली.

    नवी दिल्ली – काल कर्नाटकात सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर झाला आहे. महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मांडला, त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. तसेच कर्नाटकाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिल्यास आम्ही त्यांची गय करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊतांवर बोचरी टिका केली होती. दरम्यान, आज माध्यमांशी दिल्लीत संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बोम्मई, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

    म्हणून बोम्मईंची जीभ चालते

    दरम्यान, राऊतांना तुम्ही चीनचे इंजट असल्याची टिका बोम्मईनी केली असं विचारले असता, चीनच्या पंतप्रधानांना, राष्ट्रप्रमुखांना अंदमानमध्ये बोलावून पापडी घायला घालणाऱ्यांना काय मग काय म्हणायचे? असं राऊत यांनी म्हणत केंद्रावर टिका केली. तसेच
    चीनने जगभर घुसखोरी केली आहे. देशात कर्नाटक देखील महाराष्ट्रात घुसखोरी करत आहे. सीमाप्रश्नी आग लावण्याच काम बोम्मई करताहेत. बोम्मईंनी आम्हाला संस्कार शिकवण्याची गरज नाही. बोम्मईंची जास्त जीभ का चालत आहे, कारण आपले मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री शांत आहेत, म्हणून ते जास्त बोलत आहेत.

    महाराष्ट्र सरकारने देखील कर्नाटकच्या विरोधात ठराव करावा

    कर्नाटकने जो ठराव मंजूर केला, एक इंच जमीन देणार नाही असं म्हटलंय, आम्ही कायद्च्या भाषेत बोलतो, फायद्याच्या भाषेत बोलत नाही, जसा कर्नाटकाने महाराष्ट्राच्या विरोधात ठराव केला, तसा महाराष्ट्र सरकारने देखील कर्नाटकच्या विरोधात ठराव करावा अशी मागणी राऊतांनी केली. आमचा सांस्कृतिक वाद नाही, अचनाक बोम्मईंनी वाद निर्माण केला आहे, अशी टिका राऊत यांनी मुख्यमंत्री बोम्मईंवर केली.

    महाराष्ट्राचे दुबळे सरकार

    देशाच्या गृहमंत्र्यासमोर जे ठरले आहे, ते बोम्मई मान्य करत  नाहीत, पक्षाचाच आदेश बोम्मई मानत नाहीत. कर्नाटकने जसे ठराव मांडला, तसेच महाराष्ट्र सरकारने सभागृहात ठराव मांडला पाहिजे. सरकार कोणाचीही चौकशी, एसआयटी लावत आहे, जर महाराष्ट्र सरकारमध्ये हिंमत असेल तर बोम्मई यांच्यावर सरकारने खटला दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात अत्यंत दुबळे सरकार आहे, दुबळे मुख्यमंत्री बसले आहेत, अशी टिका राऊत यांनी केली.

    …तर आम्ही कर्नाटकात घुसू

    आम्ही कर्नाटकात घुसण्याची भाषा करतोय, पण या सरकारची हिम्मत आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. सरकारने तयारी केली पाहिजे, सरकार शेपूट घालून बसले आहे, आम्ही कर्नाटकात जाऊन तिकडे आंदोलन करायला तयार आहे. हा राज्याच्या अस्मितेचा विषय आहे, हा एका पक्षाचा विषय नाही. न्यायालयाचा निर्णय महत्वाचा आणि यावर आम्ही बोलतो, पण बोम्मईंनी अचानक हा मुद्दा उकरुन काढला आहे, अशी टिका राऊतांनी बोम्मईंवर केली.