दिलीप महालनाबिस, सुधा मूर्ती, रविना टंडन, झाकीर हुसेन यांना पद्म पुरस्कार जाहीर, एकूण १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातून ‘या’ दिग्ग्जांना बहुमान?, सविस्तर यादी पाहा…

यामध्ये सर्वाधिक ९१ पद्मश्री, ९ पद्मभूषण आणि ६ पद्मविभूषण पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली– ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार (Padma Awards 2023) जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण अशा तीन पुरस्कारांचा समावेश असतो. (Padma Bhushan, Padma Shri and Padma Bhushan) केंद्र सरकारने एकूण १०६ जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड केली आहे. यामध्ये सर्वाधिक ९१ पद्मश्री, ९ पद्मभूषण आणि ६ पद्मविभूषण पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

    महाराष्ट्रातून एकूण १२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन आणि प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन या दिग्गजांचा समावेश आहे. तेलंगणातील ८० वर्षीय भाषाशास्त्राचे प्राध्यापक बी. रामकृष्ण रेड्डी यांना साहित्य आणि शिक्षण (भाषाशास्त्र) क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कांकेर येथील गोंड ट्रायबल वूड कार्वर अजय कुमार मंडावी यांना कला (लाकडावरील कोरीव काम) क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. समाजसेवा, क्रीडा, कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, उद्योग या आणि यासारख्या क्षेत्रात अनन्यसाधारण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात.

    महाराष्ट्राचे परशुराम खुने यांना पद्मश्री…

    पद्म पुरस्कार मिळणाऱ्या मान्यवरांमध्ये महाराष्ट्रातील परशुराम कोमाजी खुने यांचा समावेश असून त्यांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. औषधनिर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबीस यांचा गौरव होणार आहे. ते मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आतापर्यंत ५००० नाटकांच्या प्रयोगांमध्ये ८०० पेक्षा जास्त भूमिका केलेल्या आहेत.

    महाराष्ट्राचे प्रभाकर मांडे, गजानन माने यांना पद्मश्री

    महाराष्ट्रातील प्रभाकर भानुदास मांडे यांना आपल्या साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे तर गजानन माने यांना समाजसेवेमुळे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतेच निधन झालेले राकेश झुनझुनवाला (महाराष्ट्र,) यांनादेखील मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

    महाराष्ट्रातील पुरस्कारनिहाय मानकरी

    पद्मविभूषण

    झाकीर हुसेन (तबलावादक)

    पद्मभूषण

    सुमन कल्याणपुर, दीपक धार आणि कुमार मंगलम बिर्ला.

    पद्मश्री

    राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), परशुराम खुणे, भिकू रामजी इदाते, प्रभाकर मांडे, रमेश पतंगे, गजानन माने, रविना टंडन आणि कुमी वाडिया.

    पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर

    मुलायमसिंह यादव (मरणोत्तर)
    दिलीप महालनाबीस (मरणोत्तर)
    झाकीर हुसेन
    एसएम कृष्णा
    श्रीनिवास वर्धन
    बालकृष्ण दोशी