महाराष्ट्राचे परशुराम खुने, प्रभाकर मांडे, गजानन माने यांना पद्मश्री; तर दिलीप महालनाबिस यांना पद्मविभूषण, महाराष्ट्रातून बारा जणांना पुरस्कार, कोण आहेत हे पुरस्कारमूर्ती? वाचा यांची सविस्तर माहिती…

महाराष्ट्रातून एकूण १२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये परशुराम खुने, प्रभाकर मांडे, गजानन माने यांना पद्मश्री या दिग्गजांचा समावेश आहे. समाजसेवा, क्रीडा, कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, उद्योग या आणि यासारख्या क्षेत्रात अनन्यसाधारण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात.

  नवी दिल्ली– ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार (Padma Awards 2023) जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण अशा तीन पुरस्कारांचा समावेश असतो. (Padma Bhushan, Padma Shri and Padma Bhushan) केंद्र सरकारने एकूण १०६ जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड केली आहे. यामध्ये सर्वाधिक ९१ पद्मश्री, ९ पद्मभूषण आणि ६ पद्मविभूषण पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर महाराष्ट्रातून एकूण १२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये परशुराम खुने, प्रभाकर मांडे, गजानन माने यांना पद्मश्री या दिग्गजांचा समावेश आहे. समाजसेवा, क्रीडा, कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, उद्योग या आणि यासारख्या क्षेत्रात अनन्यसाधारण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात.

  पद्मविभूषण (मरणोत्तर)

  दिलीप महालनाबिस

  ORS चे जनक आणि प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. दिलीप महालनोबिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. बांगलादेश युद्धादरम्यान जीव वाचवणारे उपाय विकसित करण्याचे आणि ओरल रीहायड्रेशन थेरपी (ORT) लोकप्रिय करण्याचे श्रेय डॉ. दिलीप महालनोबिस यांना जाते. तसेच औषधनिर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना यांना ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  पद्मभूषण

  सुमन कल्याणपूर

  १९५४पासून तीन दशकांचा काळ सुमन कल्याणपूर यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपल्या स्निग्ध, नितळ गळ्यानं व मधुर शैलीनं गाजवला आहे. १३ भारतीय भाषांमध्ये ३५०० गीतं गाताना, त्यांनी स्वतःचं कोमल आत्मभान जागृत ठेवलं. आवाजाचा तरल पोत, विलक्षण लगाव, कुठल्याही सप्तकात पोहोचताना कुठंही तीक्ष्ण न होणारा स्वर यांतून निर्माण झालेली गायकी म्हणजे सुमनशैली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

  महाराष्ट्रातील पद्मश्री…

  परशुराम खुने

  झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुने अशी ओळख आहे, परशुराम खूने यांनी त्यांच्या आयुष्यात ५००० हून अधिक नाटकांमध्ये सहभाग घेतला आहे. ज्यामध्ये त्याने ८०० हून अधिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. लोकनृत्यातून लोकांचे प्रबोधन करण्याचे काम रक्तही करतात. याद्वारे त्यांनी नक्षलवाद्यांकडून दिशाभूल झालेल्या अनेक तरुणांना बाहेर काढले आहे. यासोबतच समाजात असलेल्या अनेक वाईट गोष्टींविरुद्ध लोकांना जागृत करण्याचे कामही ते करतात. ते मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आतापर्यंत ५००० नाटकांच्या प्रयोगांमध्ये ८०० पेक्षा जास्त भूमिका केलेल्या आहेत.

  प्रभाकर मांडे

  महाराष्ट्रातील प्रभाकर भानुदास मांडे यांना आपल्या साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. प्रभाकर मांडे (इ.स. १९३३: सावखेड, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र) हे विद्यापिठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर लोकसाहित्याचा अभ्यास करणारे संशोधक आहेत. त्यांचे शिक्षण मिलिंद महाविद्यालय,औरंगाबाद झाले. डॉ. मांडे यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना केली. ही संस्था महाराष्ट्रात लोकसाहित्याच्या अभ्यासकांना एकत्र आणते. त्यांनी महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजित केल्या. औरंगाबादचे प्रख्यात लोकसाहित्यिक डॉ. प्रभाकर मांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

  गजानन माने

  तर गजानन माने यांना समाजसेवेमुळे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कुष्ठरोगींसाठी काम करणारे समाजसेवक अशी माने यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुष्ठरुग्णांची सेवा करत कल्याणमध्ये हनुमाननगर कुष्ठरोग वसाहतीचा पाया रचणाऱ्या गजानन माने यांच्या कार्याची दखल केंद्राने घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

  राकेश झुनझुनवाला

  राकेश झुनझुनवाला (महाराष्ट्र,) यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. व्यवसाय तसेच शेअर मार्केटमध्ये वेगळा ठसा उमटविणाऱ्या झुनझुनवाला यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

  रविना टडंन, सिनेअभिनेत्री

  १९९० पासून बॉलिबूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले. तसेच काही वेगळ्या व लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांनी विविध चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली, त्यामुळं रविना टडंना यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

  झाकीर हुसेन (तबलावादक)

  तबल्याच्या तालावर लोकांना नाचायला भाग पाडणारे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण जाहीर झाला आहे. झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. तबला वाजवाचे कौशल्य त्यांना त्यांचे वडील अल्ला रक्खा खान यांच्याकडून मिळाले आहे, जे स्वत: प्रसिद्ध तबलावादक होते. झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी वडिलांकडून पखावज वाजवायला शिकले. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला आणि 1973 मध्ये त्यांनी ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ नावाचा पहिला अल्बम लॉन्च केला. त्यांच्या या अल्बमला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला

  दीपक धर (अभियांत्रिकी)

  भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) मानद प्राध्यापक डॉ. दीपक धर यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सांख्यिकी भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. धर यांचे संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. अलीकडेच त्यांना प्रतिष्ठेच्या बोल्ड्झमन पदकाने गौरवण्यात आले होते. हे पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले होते.

  ज्येष्ठ समाजसेवक भिकुजी इदाते

  टेटवली, ता. दापोली येथे दादांचा (भिकुजी इदाते) जन्म 2 जून 1949 मध्ये झाला. घरात अठराविश्व दारिद्रय. चार बहिणी आणि दादा यांचे संगोपन करणेही कठीण अशी स्थिती. प्रवासादरम्यानच समाजातील समस्यांवर उत्तर शोधत दादांनी काही संस्थाही सुरू केल्या. असोंडमध्ये मागास विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करुन संस्थात्मक कामाचा श्रीगणेशा झाला. आज पैसे कमावण्यासाठी अनेक संस्था उभ्या रहातात. दादांनी अनेकवेळा पदरमोड करुन समाजहितासाठी संस्था उभ्या केल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम, अनेक संस्थांचा व्याप, भटक्या विमुक्त मागास ज्ञातीसंस्थाचे काम यामध्ये अविरत मग्न आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव होणार आहे.

  साहित्यिक रमेश पतंगे

  साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळं त्यांच्या या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने साहित्यिक रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

  कुमी वाडिया

  मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.