Punjab Blasts

पंजाब पोलिसांच्या मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तरनतारनच्या भिखीविंड येथील रहिवासी निशान सिंह याला ताब्यात घेतले आहे. निशान सिंह हा तरनतारनच्या भिखीविंडचा रहिवासी आहे. त्याचे गाव भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. मोहाली आणि फरीदकोटच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला फरीदकोट येथून अटक केली. या कटाचे पाकिस्तानी कनेक्शनही समोर येत आहे(Pakistan connection to Punjab's Mohali attack).

  चंदीगड : पंजाब पोलिसांच्या मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तरनतारनच्या भिखीविंड येथील रहिवासी निशान सिंह याला ताब्यात घेतले आहे. निशान सिंह हा तरनतारनच्या भिखीविंडचा रहिवासी आहे. त्याचे गाव भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. मोहाली आणि फरीदकोटच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला फरीदकोट येथून अटक केली. या कटाचे पाकिस्तानी कनेक्शनही समोर येत आहे(Pakistan connection to Punjab’s Mohali attack).

  या हल्ल्यामागे पाकिस्तानात बसलेला कुख्यात गुंड हरविंदर सिंह उर्फ ​​रिंदा याचा हात असल्याचे मानले जात आहे. रिंदाने हे रॉकेट लाँचर पंजाबमध्ये ड्रोनद्वारे पाठवल्याचं समजते. पोलिस आता निशान रिंदाची पाकिस्तानात बसलेल्या रिंदासोबतच्या संपर्काबद्दल चौकशी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 20 संशयितांनाही ताब्यात घेतले आहे.

  इमारत उडविण्याचा कट

  पंजाबचे डीजीपी व्हीके भवरा यांनी हल्ल्यासाठी ट्राय नायट्रो टाल्यून वापरला गेला असावे, म्हणजे संपूर्ण इमारत उडवण्याचा कट होता, अशी भीती व्यक्त केली. दरम्यान, हल्ल्यात रशियन रॉकेट लाँचर वापरले हल्ल्यात रशियन रॉकेट लाँचरचा वापर करण्यात आला. संरक्षण तज्ज्ञांच्या मते अमेरिकेने ही शस्त्रे अफगाणिस्तानला प्रशिक्षणासाठी दिली होती. तालिबान्यांनी तिथे कब्जा केला. त्यानंतर ही शस्त्रे पाकिस्तानला विकण्यात आली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हे रॉकेट लाँचर पंजाबमध्ये पाठवण्यात आले आहे. या हल्ल्यामागे पंजाब पोलिसांचे गुप्तचर रेकॉर्ड आणि नेटवर्क नष्ट करण्याचा कट होता.

  7 हजार कॉल्सची तपासणी

  पोलिस 7 हजार कॉल्स तपासत आहेत पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर सोमवारी रात्री 7.45 वाजता हल्ला झाला. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 20 हून अधिक संशयितांना अटक केली आहे. याशिवाय 7 हजार कॉल्सची चौकशी सुरू आहे.

  खलिस्तानी दहशतवाद्यांना एटीएस घेणार ताब्यात

  खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याच्या स्लीपर सेलमध्ये 5-6 महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या चार आरोपींना हरियाणातील कर्नाल येथून अटक करण्यात आली आहे. आता महाराष्ट्र एटीएस या 4 खलिस्तानी दहशतवाद्यांना ताब्यात घेणार आहे. गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर अशी अटक आरोपींची नावे आहेत.