पाकिस्तानची ‘गंदीबात’, महाविद्यालयीन मुली आणि सेक्स वर्कर्सना नग्न चॅट-कॉल्सचे प्रशिक्षण

पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या जवानांना अडकवण्यासाठी हनीट्रॅपचे ७ मॉड्यूल तयार केले आहेत, ज्यामध्ये २५ हून अधिक मुली आहेत. त्यापैकी काही महाविद्यालयीन तरुणी आहेत तर काही सेक्स वर्कर आहेत. लष्करात ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते, त्याच पद्धतीने पाकिस्तान या मुलींना हनीट्रॅपचे प्रशिक्षण देत आहे.

    नवी दिल्ली – भारतीय लष्कराला लक्ष करण्यासाठी पाकिस्तान हनीट्रॅपचे एक संपूर्ण नेटवर्क चालवत आहे. नुतचेच जोधपुरातील लष्कराच्या एका जवानाला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढल्याची घटना उजेडात आली. ‘गनर’पदी तैनात प्रदीपची पाकिस्तानी एजंटने रिया बनून फसवणूक केली. या एजंटचे सौंदर्य व लग्नाच्या आमिषाला भुलून प्रदीपने लष्कराची गुपिते उघड केली. सध्या तो तुरुंगाची हवा खात आहे.

    ही घटना उजेडात आल्यानंतर  या प्रकरणाचा शोध घेतला. त्यात पाकने आर्मी जवानांची फसवणूक करण्यासाठी हनीट्रॅपचे ७ मॉड्यूल तयार केल्याचे व त्यात २५ तरुणी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. यातील काही महाविद्यालयीन तरुणी तर काही सेक्स वर्कर्स आहेत. त्यांना जवानांना जाळ्यात कसे ओढायचे याची रितसर ट्रेनिंग दिली जाते.

    गुप्त कागदपत्रांसाठी पैशांचे अमिष
    काही प्रकरणांमध्ये, या हनीट्रॅप मुली गुप्त कागदपत्रांसाठी पैसे देखील देतात. ‘आर्मी ऑर्डर’ आणि ‘ऑर्बेट’ या गुप्त दस्तऐवजाच्या बदल्यात लष्कर १० ते १२ हजार रुपये देऊ करते. भारतात सध्या असलेल्या स्लीपर सेलद्वारे पैसे पाठवले जातात. बिटकॉइनच्या मदतीने स्लीपर सेलमध्ये पैसे पाठवले जातात. जिथे ते एटीएम कॅश डिपॉझिट मशीन किंवा ऑनलाइन सैनिकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतात.

    मैत्री : पाकिस्तानी हनीट्रॅप आर्मीच्या एजंट असलेल्या या मुली सोशल मीडियावर फेक आयडी तयार करून आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.

    प्यार भरी बात: विनंती मान्य केल्यानंतर ती प्रेमाने बोलते. प्रत्येक सुख-दुःखात ती साथ देईल असा तिचा दावा आहे.

    लग्नाचे अमिष: मैत्री झाल्यानंतर ती टार्गेटला लग्नाचे अमिष दाखवते.
    सेक्स चॅट: यानंतर सेक्स चॅट सुरू होते, जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला वाटते की ती मुलगी खरोखरच त्याच्यावर प्रेम करते.

    न्यूड कॉलिंग : टार्गेटला फसवण्यासाठी न्यूड कॉल्सही केले जातात.

    या मुली प्रेमाच्या आणि वासनेच्या जाळ्यात इतक्या अडकवतात की त्यांच्या सांगण्यावरून टार्गेट देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त कागदपत्रे शेअर करण्यास तयार होतात.

    ब्लॅकमेलिंग: पीआयओ टार्गेट आणि मुलगी यांच्यातील सर्व चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करते. टार्गेटने गुप्त कागदपत्र देण्यास नकार दिल्यास न्यूड व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केले जाते.