pan card and adhar card

पॅन आणि आधार लिंक (pan card and aadhar card linking problems)करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्व्हरमध्ये अडचण असल्याचे आणि साईट सुरु होऊ शकत नाही असे मेसेज स्क्रीनवर दिसत आहेत. अनेकांनी आयकर विभागाच्या साईटवर दिसणाऱ्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट शेअर करुन आता काय करायचं असा प्रश्न विचारला आहे. ट्विटरवर लोकांनी या तक्रारी(complaint on twitter) शेअर केल्या आहेत.

    ‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक (#pancard #aadharcard)करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या साईटवर आज अनेकांनी लिंकींगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लॉगिन केले. सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२१ ही अंतिम मुदत दिली आहे. मात्र एकाच वेळ‌ी आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट दिल्याने साईट क्रॅश झाली आहे. अनेकांनी यासंदर्भात ट्विटरवर तक्रार केली आहे.

    पॅन आणि आधार लिंक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्व्हरमध्ये अडचण असल्याचे आणि साईट सुरु होऊ शकत नाही असे मेसेज स्क्रीनवर दिसत आहेत. अनेकांनी आयकर विभागाच्या साईटवर दिसणाऱ्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट शेअर करुन आता काय करायचं असा प्रश्न विचारला आहे. ट्विटरवर लोकांनी या तक्रारी शेअर केल्या आहेत.

    लिंकींग कसं करायचं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

    अनेकदा प्रयत्न करुनही पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक होत नसेल तर कोणता पर्याय वापरायचा हा प्रश्न लोकांना पडला आहे.


    या तक्रारींमुळेच PANcard आणि Aadhaar हे दोन विषय टॉप ट्रेण्डमध्ये आले आहेत. लोकांनी सरकारवर आणि आयकर विभागाच्या साईटवर संताप व्यक्त केला आहे. आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी अनेकांनी केली आहे.