muslims at delhi jama masjid

भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणं आणि द्वेषपूर्ण वक्तव्य करणं याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सोशल मीडियावरील वक्तव्यांचा तपास केल्यानंतर दोन गुन्हा दाखल करण्यात आले.

    दिल्लीतील (Delhi) जामा मशिदीबाहेर (Protest Near Jama Masjid) आज नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी हातात पोस्टर्स घेत नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम नागरिक जामा मशिदीबाहेर जमा झाले. त्यांनी आंदोलन सुरू केले. काही वेळानंतर यातील काही आंदोलक निघून गेले, मात्र काही अद्यापही आंदोलन करत आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ३१ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीने ओवैसी, वादग्रस्त साधू यती नरसिंहानंद यांचाही समावेश आहे.

    भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणं आणि द्वेषपूर्ण वक्तव्य करणं याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सोशल मीडियावरील वक्तव्यांचा तपास केल्यानंतर दोन गुन्हा दाखल करण्यात आले.