‘मी माझे आयुष्य देशासाठी झिजवले म्हणून लोकांचा मोदीवर विश्वास’; पंतप्रधान मोदींनी सांगितली ‘ती’ महत्त्वाची गोष्ट

काही लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूप काही उद्धवस्त करायला तयार आहेत. पण, हे देशच मोदींचे कुटुंब आहे. वृत्तपत्रांमधील बातम्यांमुळे किंवा टीव्हीवर आल्याने मोदींवर लोकांचा विश्वास नाही. तर मी माझे आयुष्य देशासाठी झिजवले आहे.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत होते. त्यामध्ये त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य (PM Modi Speech) केले. ते म्हणाले, ‘काही लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूप काही उद्धवस्त करायला तयार आहेत. पण, हे देशच मोदींचे कुटुंब आहे. वृत्तपत्रांमधील बातम्यांमुळे किंवा टीव्हीवर आल्याने मोदींवर लोकांचा विश्वास नाही. तर मी माझे आयुष्य देशासाठी झिजवले आहे. यामुळेच लोकांचा मोदीवर विश्वास (Trust on Modi) आहे’.

    पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही कितीही शिव्या द्या, आरोप करा, पण लोकांचा तुमच्यावर परत विश्वास बसणार नाही. तुमच्या शिव्यांना आणि आरोपांना या कोटी-कोटी भारतीयांना तोंड द्यावे लागणार आहे. या लोकांना तुम्ही अनेक दशके अडचणीत टाकले होते. भाजपने या लोकांना अडचणीतून बाहेर आणले आहे. जे आधी इथे बसायचे ते तिकडे जाऊनही फेल झाले, पण देश पास झाला. निराशेच्या गर्तेत बुडालेल्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आताच काही जण जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन आले. लालचौकात तिरंगा लावण्याचा संकल्प घेऊन मीही मागच्या शतकात गेलो होतो, तेव्हा दहशतवाद्यांनी पोस्टर लावले होते.

    दरम्यान, देशातील जनता खोटे आरोप करणाऱ्यांवर कधीच विश्वास ठेवणार नाही. देशातील ज्या गरिबाला मोफत धान्य मिळते, तो तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. अडचणींच्या काळात मोदी लोकांच्या कामाला आला आहे, म्हणून लोकांचा मोदीवर विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.

    ‘ईडी’मुळे अनेकजण आमच्याविरोधात एकत्र

    भारत सर्वांसाठी आशेचा किरण आहे. काहींना देशाची प्रगती पाहून दु:ख होत आहे. ‘ईडी’मुळे अनेकजण आमच्याविरोधात एकत्र आले आहेत. अपयश आल्यावर सरकारवर आरोप केले जातात. अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते, असेही त्यांनी सांगितले.