पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, पाहा तुमच्या शहरातले दर काय आहेत?

मागील दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळ सर्व सामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. परंतु आता मागील दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळ सर्व सामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    दररोज सकाळी ६ च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. अशात बुधवारी तब्बल २४ दिवसांनी पेट्रोलचे दर स्वस्त झाले होते. त्यानंतर आता आज पुन्हा इंधनाचे दर घसरले आहेत.

    देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

    नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.78 रुपये प्रतिलीटर

    मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.19 रुपये प्रतिलीटर

    कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 90.98 रुपये प्रतिलीटर

    चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92.77 रुपये प्रतिलीटर

    देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

    नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.10 रुपये प्रतिलीटर

    मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.20 रुपये प्रतिलीटर

    कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.98 रुपये प्रतिलीटर

    चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.10 रुपये प्रतिलीटर