271 प्रवाशांनी भरलेल्या विमानाच्या वॉशरूममध्ये पायलटचा मृत्यू, ‘असं’ झालं इमर्जन्सी लँडिंग!

अलीकडेच उडणाऱ्या विमानाच्या पायलटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हल्ल्याच्या वेळी पायलट वॉशरूममध्ये होते आणि त्यांच्या पडल्याची माहिती खूप उशिरा मिळाली. अशा स्थितीत वैमानिकांनी तातडीने इमर्जन्सी लँडिंग केले.

  विमान हवेत असताना पायलटची तब्येत (Pilot Death In Plane) बिघडल्याची अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत को-पायलटने प्लेनचा ताबा घेऊन इमर्जन्सी लँडिंग केले आहे. सध्या असचं एक प्रकरण सध्या चिलीमधून समोर आलं आहे. ऐन प्रवासात पायलटची तब्येत बिघडल्यानंतर मृत्यू झाला. त्यांनतर प्लेनचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

  विमान प्रवासात पायलटचा मृत्यू

  मिळालेल्या माहितीनुसार, 271 प्रवाशांना घेऊन मियामीहून चिलीला जात होतं. विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर  पायलट 56 वर्षीय इव्हान अंदौरचा इव्हानला हृदयविकाराचा झटका आला. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विमानाच्या वॉशरूममध्ये गेला. येथे अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे बाथरूममध्ये पडून होता. क्रू मेंमरच्या लक्षात आल्यावर त्याला वाचविण्याचे सगळे प्रयत्न करण्यात आले मात्र, त्याचा मृत्यू झाला.

  बाथरुममध्ये अपघात झाल्याचे समजल्यानंतर विमानाच्या सहवैमानिकांनी पनामा सिटीच्या टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. येथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय पथकाने इवानचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. विमान उतरत असताना, इसाडोरा नावाची एक परिचारिका विमानातील दोन डॉक्टरांसह पायलटच्या मदतीला धावली. सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. विमान पनामा सिटीमध्ये उतरल्यानंतर वैमानिकाला मृत घोषित करण्यात आले.

  विमान केलं रिकामं

  एका प्रवाशाने सांगितले की, टेकऑफनंतर सुमारे 40 मिनिटांनी सह-वैमानिकाने विमानातील सर्व डॉक्टरांना विनंती केली. अंदौरची प्रकृती बिघडल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लँडिंगवर विमान रिकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.