PM मोदी करणार या वर्षातील शेवटची मन की बात

या कार्यक्रमात पीएम मोदी विविध क्षेत्रातील लोकांकडून सल्ले आणि सूचना मागवत असतात आणि नंतर त्यांच्या कार्यक्रमातून अनेकांचा उल्लेख करतात. नरेंद्र मोदींच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता आणि तुमच्या सूचना पाठवू शकता. याशिवाय mygov.in वर दिलेल्या माहितीनुसार तुम्ही १९२२ वर मिस्ड कॉल देखील करू शकता आणि एसएमएसमध्ये मिळालेल्या लिंकवर जाऊन तुमच्या सूचना थेट पंतप्रधानांना देऊ शकता. तुम्ही १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर डायल करून तुमच्या सूचना नोंदवू शकता.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पीएम मोदी ‘मन की बात’ करतात. पंतप्रधान सकाळी ११ वाजता आपलं मनोगत व्यक्त करतील. पीएम मोदींनी या महिन्याच्या सुरुवातीला ट्विट केले होते की, मला या महिन्याच्या २६ तारखेला मन की बातसाठी अनेक इनपुट्स मिळत आहेत. २०२१ या वर्षातील हा शेवटचा मन की बातचा कार्यक्रम असेल.

    काल शनिवारी १२ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण, बुस्टर डोसबाबत मोठी घोषणा केल्यानंतर आज मन की बातमध्ये पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासह बूस्टर डोस संबंधीदेखील माहिती दिली.

    या कार्यक्रमात पीएम मोदी विविध क्षेत्रातील लोकांकडून सल्ले आणि सूचना मागवत असतात आणि नंतर त्यांच्या कार्यक्रमातून अनेकांचा उल्लेख करतात. नरेंद्र मोदींच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता आणि तुमच्या सूचना पाठवू शकता. याशिवाय mygov.in वर दिलेल्या माहितीनुसार तुम्ही १९२२ वर मिस्ड कॉल देखील करू शकता आणि एसएमएसमध्ये मिळालेल्या लिंकवर जाऊन तुमच्या सूचना थेट पंतप्रधानांना देऊ शकता. तुम्ही १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर डायल करून तुमच्या सूचना नोंदवू शकता.

    नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. आज ८४ वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण ३ ऑक्टोबर २०१४ साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.