मोदी आणि बायडेन यांच्यात २४ सप्टेंबरला द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत भारत- अमेरिकेतील संबंधांवर चर्चा होईल. तसेच दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते.
पंतप्रधान मोदी आज अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. नुकतेच मोदी विमानतळावर दाखल झाले आहेत. या दौऱ्यावर मोदींसह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहेत. अमेरिकेतील सत्ता बदलानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिली अमेरिका भेट आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी जो बायडेन यांची निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी संयुक्त राष्ट्रांची महासभा म्हणजेच युएनजीएच्या ७६ व्या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत.
#WATCH | PM Narendra Modi departs from New Delhi for a 3-day visit to US to attend the first in-person Quad Leaders’ Summit, hold bilateral meetings, and address United Nations General Assembly pic.twitter.com/hxNeQEKMH1
— ANI (@ANI) September 22, 2021
मोदी आणि बायडेन यांच्यात २४ सप्टेंबरला द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत भारत- अमेरिकेतील संबंधांवर चर्चा होईल. तसेच दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते.
#WATCH | PM Narendra Modi departs from New Delhi for a 3-day visit to US to attend the first in-person Quad Leaders’ Summit, hold bilateral meetings, and address United Nations General Assembly pic.twitter.com/hxNeQEKMH1
— ANI (@ANI) September 22, 2021
क्वाड देशांच्या नेत्यांना पहिल्यांदाच बायडेन हे राष्ट्राध्यक्ष म्हणून भेटणार आहेत.या दौऱ्यात मोदींसह जगभरातील नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जगभरातील जवळपास १०० देशांचे प्रमुख नेते अमेरिकेत येणार आहेत. पंतप्रधान मोदींबरोबरच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचाही समावेश आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यानच्या कार्यक्रमांची माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी आज बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना वैश्विक शिखर संमेलनात सहभागी होतील.
फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांचे मोदींना धन्यवाद देणारे हिंदी ट्वीट
अमेरिकाच्या दौऱ्याच्या आधी पंतप्रधान मोदींनी काल फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह फोनवर बातचीत केली. मोदींसह झालेल्या संभाषणानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हिंदीमध्ये “नमस्ते, प्रिय साथी, प्रिय मित्र।” ते ट्वीट करत मोदींचे आभार मानले आहेत.
नमस्ते, प्रिय साथी, प्रिय मित्र।
Thank you for reaffirming the importance of our Strategic Partnership. India and France are strongly committed to making the Indo-Pacific an area of cooperation and shared values. We will continue to build on this. https://t.co/V4nUu0aGTH— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) September 21, 2021
मॅक्रॉन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, आमच्या सहभागाला बळकटी देण्याकरिता धन्यवाद. भारत आणि फ्रान्स पॅसिफिक सहकार्य आणि सामायिक मूल्ये बनविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहेत. ही भागीदार पुढेही सुरु राहिल.