पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांना केला फोन, म्हणाले- मी 20 वर्षांपासून असाच अपमान सहन करत आहे!

खुद्द उपराष्ट्रपतींनी या घटनेचे वर्णन लज्जास्पद असल्याचे सांगून एक खासदार खिल्ली उडवत होता आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हिडिओ बनवत असल्याचे सांगितले. ही अत्यंत आक्षेपार्ह आणि अस्वीकारार्ह घटना आहे

  नवी दिल्ली : संसदेतून निलंबित केल्यानंतर टीएमसी नेते कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती धनखड  (Jagdeep Dhankhar Mimicry)यांची मिमिक्री केली. सध्या या प्रकरणावरुन चांगलच राजकारण गाजतयं.अनेक नेत्यांनी कल्याण बॅनर्जी यांनी केलेलं कृत्य अयोग्य असल्याचं म्हण्यलयं. या प्रकरणावरुन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)  फोन केला. झालेल्या प्रकारबद्दला त्यांनी शोक व्यक्त करत म्हण्टलं की,  मलाही गेल्या 20 वर्षांपासून असाच अपमान सहन करावा लागत आहे. स्वत: उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही माहिती दिली.

  काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

  उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या घटनेवर खुद्द पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींना फोन करून संपूर्ण घटनेचा निषेध केला आहे. ही माहिती देताना उपराष्ट्रपती म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि गेल्या 20 वर्षांपासून मी स्वत: अशा अपमानाचा सामना करत असल्याचे सांगितले.

  कोणताही अपमान माझा मार्ग बदलू शकत नाही – जगदीप धनखर

  उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी त्यांच्या एक्स अंकाऊटं वर पोस्ट करत लिहिले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला. काल संसद संकुलात काही खासदारांच्या घृणास्पद कृत्याबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी मला सांगितले की, गेली वीस वर्षे ते असे अपमान सहन करत आहेत, पण भारताच्या उपराष्ट्रपतीसारख्या घटनात्मक पदावर आणि तेही संसदेत, हे दुर्दैवी आहे. मी त्यांना म्हणालो – पंतप्रधान, काही लोकांची कृती मला थांबवणार नाही. मी माझे कर्तव्य पार पाडत आहे आणि आपल्या राज्यघटनेत दिलेल्या तत्त्वांचे पालन करत आहे. मी माझ्या हृदयाच्या तळापासून त्या मूल्यांसाठी वचनबद्ध आहे. कोणताही अपमान माझा मार्ग बदलू शकत नाही.”

  काय आहे संपूर्ण प्रकरण

  तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या सुरक्षेबाबत विरोधी खासदारांच्या मागणीवरून संसदेच्या आवारात निदर्शने केली.  यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली, त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच  व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर जगदीप धनखड यांनी प्रतिक्रिय दिली. ते म्हणाले की, खासदार खिल्ली उडवत होता आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हिडिओ बनवत होता, हे फार लज्जास्पद आहे. ही अत्यंत आक्षेपार्ह आणि अस्वीकारार्ह घटना आहे.