पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर परिषदेच्या समाप्तीची केली घोषणा, भारताने ब्राझीलकडे सोपवली अध्यक्षता!

या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक त्याच्यासही तब्बल३० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधीं दिल्लीत दाखल झाले होते.

  नवी दिल्लीतील दोन दिवसीय (G20 Summit) भारतात यशस्वीपणे संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेच्या समापनाची घोषणा केली. त्यांनी G20 चे पुढील अध्यक्षपद ब्राझीलकडे सोपवले आहे. 9 आणि 10 सप्टेंबर नवी दिल्लीतील प्रगती मैैदानावर पार पडली. या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक त्याच्यासही तब्बल३० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधीं दिल्लीत दाखल झाले होते.

  किती देशांचा G-20 मध्ये होता समावेश

  या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. यावर्षी भारताने बांगलादेश, इजिप्त, नेदरलँड, मॉरिशस, नायजेरिया, सिंगापूर, स्पेन, संयुक्त अरब अमिराती, ओमान या देशांना विशेष आमंत्रित केले आहे.

  G-20 शिखर परिषदेतून भारताच्या पदरी काय?

  • विकसित देशांच्या यादीत भारताला स्थान मिळणार का?
  • दक्षिया आशियात भारताचे वजन वाढण्याची शक्यता
  • आतंरराष्ट्रीय पातळीवर भारत प्रबलशाही असल्याचा संदेश पोहचेल
  • जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा पहिल्यापेक्षा अधिक उजळून निघेल
  • जेव्हा ‘ग्लोबल साउथ’नं आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत एक प्रमुख भागधारक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात भारतानं यश मिळवलं आहे.
  • वाढती असमानता, अन्न आणि खनिज तेलाच्या वाढत्या किंमती आणि वातावरणातील बदल करण्यात भारताला यश येईल
  • जागतिक राजकारणी म्हणून मोदी स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी
  • हवामान बदल, विकसनशील देशांवर कर्जाचा वाढता बोजा, डिजिटल ट्रांसफॉर्मेशन, वाढती महागाई आणि अन्न- ऊर्जा सुरक्षा.
  • भारताच्या निवडणुकीच्या राजकारणात परराष्ट्र धोरण महत्त्वाची भूमिका बजावणार
  • G-20 शिखर परिषदेमधून वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचरचा मंत्री दिला गेलाय.