pm narendra modi and 6g

भविष्यातील टेक्नॉलॉजीसाठी भारत ITU सह एकत्रितपणे काम करेल. तसेच नवीन भारत ITU क्षेत्रीय कार्यालय 6G साठी योग्य वातावरण तयार करण्यास मदत करेल. देशामध्ये 6जी टेस्ट बेड सुरु करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलं. भारत 2030 पर्यंत हाय-स्पीड 6G कम्युनिकेशन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

सध्या देशातील अनेक शहरांमध्ये 5 जी सेवा सुरु झाली आहे. आता देश 6जी नेटवर्कच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशात 5जीच्या यशस्वी लॉन्चिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी बुधवारी इंडिया 6 व्हिजन डॉक्युमेंटची घोषणा केली आहे. तसेच 6जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) टेस्ट बेड लॉन्च केला. विज्ञान भवन येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) प्रादेशिक कार्यालय आणि इनोव्हेशन सेंटरचंही उद्घाटन केलं.

ITU उद्घटनाच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “6जी R&D टेस्ट बेडमुळे देशात नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी मदत होणार आहे. भारत 6जी व्हिजन डॉक्युमेंट आणि 6जी टेस्ट बेड देशामध्ये नवकल्पना, क्षमता निर्माण आणि वेगाने टेक्नॉलॉजी अवलंब करण्यासाठी एक योग्य वातावरण तयार करेल. 4जी सेवेच्या आधी भारत केवळ दूरसंचार टेक्नॉलॉजीचा वापरणारा देश होता. परंतु भारत आज जगातील दूरसंचार टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा निर्यातदार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.”

तसेच पंतप्रधान म्हणाले, “भारत 5जी च्या मदतीने संपूर्ण जगाची कार्यसंस्कृती बदलण्यासाठी अनेक देशांसोबत काम करत आहे. या 100 नवीन लॅब्स भारताच्या गरजांनुसार 5G अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्यात मदत करतील. मग ते 5G स्मार्ट क्लासरूम्स असो, शेती असो, इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा आरोग्य सेवा असो, भारत प्रत्येक दिशेला वेगाने काम करत आहे.”

भविष्यातील टेक्नॉलॉजीसाठी भारत ITU सह एकत्रितपणे काम करेल. तसेच नवीन भारत ITU क्षेत्रीय कार्यालय 6G साठी योग्य वातावरण तयार करण्यास मदत करेल. देशामध्ये 6जी टेस्ट बेड सुरु करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलं. भारत 2030 पर्यंत हाय-स्पीड 6G कम्युनिकेशन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल (TSSC) चे सीईओ अरविंद बाली म्हणाले,“ 6जी मध्ये 2030 पर्यंत अंदाजे 100 दशलक्ष सक्रिय 6जी उपकरणांसह जास्त वेग प्रदान करण्याची क्षमता आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान म्हणाले होते की 2030 पर्यंत सरकार 6जी सेवा लॉन्च करण्याची तयारी करत आहे.”