देशाचा खरा इतिहास दाबण्यात आला: मोदी

मोदी म्हणाले - भारताचा इतिहास केवळ गुलामगिरीचा नाही. देशाच्या वीरांच्या अनेक कहाण्या आहेत. अशा लोकांविषयी काहीच सांगण्यात आले नाही. आता आम्ही यापूर्वी झालेल्या सर्वच चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा खरा इतिहास दडवून ठेवल्याच्या मुद्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. देशात परकीयांचा अजेंडा पुढे रेटणारा इतिहास शिकवण्यात आला, असे ते म्हणालेत.

    मोदी म्हणाले – भारताचा इतिहास केवळ गुलामगिरीचा नाही. देशाच्या वीरांच्या अनेक कहाण्या आहेत. अशा लोकांविषयी काहीच सांगण्यात आले नाही. आता आम्ही यापूर्वी झालेल्या सर्वच चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान मोदी दिल्ली स्थित विज्ञान भवनात लचित बरफुकान यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सेनापती लचित यांच्या योगदानाचाही प्रामुख्याने उल्लेख केला. वीर लचित सारख्या वीरांना जन्मास घालणाऱ्या आसामच्या धरतीला मी वंदन करतो. वीर लचित यांनी आपल्या आयुष्यात खूप धाडस व शौर्य दाखवले. आसामची माती याची साक्षीदार आहे.

    ते पुढे म्हणाले की, कुणी तलवारीच्या ताकदीने आम्हाला झुकवण्याचा प्रयत्न केला, आमची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला, तर आम्हालाही त्याचे उत्तर देता येते. लचित बरफुकन यांचा जन्म २४ नोव्हेंबर १६२२ रोजी झाला. ते अहोम साम्राज्याचे सुप्रसिद्ध सेनापती होते. लचित यांना ईशान्येतील छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाते. कारण त्यांनी शिवाजी महाराजांसारख्याच रणनीतीने अनेकदा मोगलांचा पराभव केला होता. त्यांच्या या पराक्रमासाठी दरवर्षी आसाममध्ये २४ नोव्हेंबर रोजी लचित दिन साजरा केला जातो.