कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येची चिंता; पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली.

नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच आरोग्य व्यवस्थेचीही माहिती घेण्यात आली.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या बुधवारच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात 1134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सध्या 7,026 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. यादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. भारतात जवळपास चार महिन्यानंतर कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत.

तसेच भारतातील केरळमध्ये एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. देशात अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 1.09 टक्के नोंद झाली आहे. तर साप्ताहिक अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 0.98 टक्के नोंदवली गेली. सध्या देशात एका दिवसात हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ही 129 दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.

पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच आरोग्य व्यवस्थेचीही माहिती घेण्यात आली.