पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नऊ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार, जाणून घ्या मार्ग!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 9 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामुळे 11 राज्यांमध्ये रेल्वे संपर्क वाढेल.

  नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज 9 वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आली आहे. या गाड्या जलद गती तसेच आरामदायी प्रवासाचा अनुभव देतात.

  ‘या’ 9 वंदे भारत गाड्या सुरू होतील

  उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्सप्रेस
  तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस
  हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
  विजयवाडा-चेन्नई (रेनिगुंटा मार्गे) वंदे भारत एक्सप्रेस
  पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेस
  कासारगोड – तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस
  राउरकेला – भुवनेश्वर – पुरी वंदे भारत एक्सप्रेस
  रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस
  जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस
  या 9 ट्रेन राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या अकरा राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवतील.

  कमी वेळेत प्रवास

  वंदे भारत ट्रेन ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. यापेक्षा कमी वेळेत हा प्रवास पूर्ण होईल. वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी अर्ध हायस्पीड ट्रेन आहे. या गाड्या ताशी 160 किलोमीटरचा वेग गाठण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. हे GPS-आधारित प्रवासी माहिती प्रणाली, ऑनबोर्ड वाय-फाय आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
  देशात स्लीपर क्लास वंदे भारत ट्रेनसेट सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा या लांब पल्ल्याच्या मार्गांवर ते चालवले जाईल. सध्या सर्व वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार क्लासेस आहेत. ती कमी अंतराच्या मार्गांवर चालवली जात आहे.