
एकिकडे काँग्रेस पराभूत होत असताना, दुसरीकडे नेतृत्त्व, संघटना, गट-तट यावरुन अंतर्गत मतभेद हे समोर आले आहेत, त्यामुळं पक्षश्रेष्ठी समोर नवीन आव्हान उभे राहिलं आहे. दरम्यान, काँग्रेसची नुकतीच जी-23 समुहाची बैठक पार पडली होती. सध्या काँग्रेसमध्ये जी-23 वरुन राजकारण तापलंय.
नवी दिल्ली : देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकात काँग्रेसला दारुण पराभवला सामोरी जावे लागले. त्यामुळं सध्या काँग्रेस आत्मपरिक्षण करत आहे, यामुळं दोन दिवसांपूर्वी जी-23 हि एक बैठक आयोजित केली होती, आता या बैठकीवरुन सुद्धा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाटावर आला आहे. जी-23 च्या नेत्यांनी केलेल्या मागणीवरुन आता काँग्रेसचं राजकारण आणखी तापलंय. काही जण काँग्रेस पक्षाला तोडण्याच्या प्रयत्नात आहेत, असा घणाघाती आरोप मल्लिकार्जून खरगे यांनी केलाय. सोनिया गांधी या सध्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्त्वावरुन सध्या काँग्रेस पक्षातील राजकारण ढवळून निघालंय. एकिकडे काँग्रेस पराभूत होत असताना, दुसरीकडे नेतृत्त्व, संघटना, गट-तट यावरुन अंतर्गत मतभेद हे समोर आले आहेत, त्यामुळं पक्षश्रेष्ठी समोर नवीन आव्हान उभे राहिलं आहे. दरम्यान, काँग्रेसची नुकतीच जी-23 समुहाची बैठक पार पडली होती. या बैठकीला कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनिष तिवारी, शशी थरूर, शंकर सिंह वाघेला, अखिलेश प्रसाद सिंह, संदीप दिक्षीत, विवेक तन्खा, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, मणिशंकर अय्यर, पीजे कुरियन, राजेंद्र कौर भट्टल, कुलदीप शर्मा, परनीत कौर आणि एमए खान यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. यावरुन सुद्धा काँग्रेसमधील मतभेद समोर आले आहेत.
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आहे. गुरुवारी गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्यासोबत G-21 नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत पाच राज्यात काँग्रेसनं केलेल्या निराशाजनक कामगिरीवर चर्चा झाली होती. काही मुद्यावर असंतुष्ट गटाची बाजू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर मांडली. असंतुष्टांचा विरोध राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाला तसेच त्यांच्या भोवती असलेल्या नेत्यांना आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची निवड तसेच उत्तरप्रदेशात महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय कार्यकारिणीमध्ये चर्चा न करताच घेतल्याचे यावेळी सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हे दोन्ही निर्णय काँग्रेसला महागात पडल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस पक्षाने ब्लॉक स्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुका घ्यावा, असा मुद्याही या चर्चेत आल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसनं आत्मपरिक्षणासाठी बैठक घेतली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदावरुन काय चर्चा झाली, यावरुनही तर्क वितर्क लढवण्यात आले होते. आता गुलाम नबी आझाद सोनिया गांधींच्या भेटीला गेल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद, पक्ष संघटना विस्तार तसेच खंबर नेतृत्व नसल्यानं पक्षाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, याधी पंजामध्ये सत्ता होती, पण काँग्रेसमधील मतभेद याचा फटका काँग्रेसला फटका बसला आहे. त्यामुळं सध्या पक्षाला चांगला नेतृत्त्वाची गरज असल्याचं बोललं जात आहे.