Power outage to meet girlfriend

प्रेमात पडलेली व्यक्ती कोणतीही गोष्ट करण्यासाठी तयार असते असे म्हटले जाते. मात्र हे काहीही करण्याच्या नादात अनेकदा प्रेमवीर आपल्या कृतीचा इतरांना त्रास होईल हा विचार करत नाही. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये घडला. येथील एका प्रेमवीराने आपल्या प्रेमासाठी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित केल्याचा प्रकार समोर आला आहे( Power outage to meet girlfriend ).

    पाटणा : प्रेमात पडलेली व्यक्ती कोणतीही गोष्ट करण्यासाठी तयार असते असे म्हटले जाते. मात्र हे काहीही करण्याच्या नादात अनेकदा प्रेमवीर आपल्या कृतीचा इतरांना त्रास होईल हा विचार करत नाही. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये घडला. येथील एका प्रेमवीराने आपल्या प्रेमासाठी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित केल्याचा प्रकार समोर आला आहे( Power outage to meet girlfriend ).

    पूर्व बिहारमधील पुर्निया जिल्ह्यातील गणेशपूर गावात गावकऱ्यांनी एका इलेक्ट्रिशियनला रंगेहाथ पकडले आहे. हा इलेक्ट्रिशियन गावातीलच त्याच्या प्रेयसीला अंधाराचा फायदा घेऊन लपून छपून भेटता यावे म्हणून संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करायचा. त्याने अनेकदा अशाप्रकारे वीजपुरवठा खंडित करून आपल्या प्रेयसीची भेट घेतली.

    गावकऱ्यांनी प्रकरणाचा लावला छडा

    गणेशपूर गावातील लोकांना आपल्या आजूबाजूच्या गावांमधील वीजपुरवठा सामान्यपणे खंडित होत नाही, असे समजले. यासंदर्भात त्यांनी चौकशी केली असता आपल्या गावातच वीज जाते असे त्यांच्या लक्षात आले. गेल्या काही महिन्यांपासून सांयकाळच्या ठराविक कालावधीमध्ये गावामध्ये दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित व्हायचा. यामुळे गावकरी हैराण झाले होते. इतर गावांमध्ये या वीजपुरवठा खंडित होण्यासंदर्भातील समस्येबद्दल चौकशी केली असता बाकी गावांमध्ये असे होत नसल्याचे गावकऱ्यांना समजले. त्यानंतर त्यांनी हे नेमके आपल्या गावाच्या बाबतीत का होते याचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर गावकऱ्यांना धक्काच बसला. गावातील इलेक्ट्रिशियन त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी स्वत: गावचा वीजपुरवठा खंडित करत असल्याचे गावकऱ्यांना समजले.

    मुंडन करून काढली धींड

    गावकऱ्यांनी सापळा रचून या इलेक्ट्रिशियनला रंगेहाथ पकडले आणि त्याची धुलाई केली. त्याचे मुंडन करून त्याची गावातील रस्त्यावरून धींड काढली. त्याच्या प्रेमप्रकरणामुळे गावातील लोकांना मागील अनेक महिन्यांपासून कारण नसताना वीजेशिवाय अनेक तास रहावत लागत असल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला होता. जेव्हा जेव्हा आपल्याला प्रेयसीला भेटण्याची इच्छा व्हायची तेव्हा आपण वीजपुरवठा खंडित करायचो अशी कबुली या इलेक्ट्रिशियनने दिली. मात्र आपला राग व्यक्त करून झाल्यानंतर गावकऱ्यांनी या इलेक्ट्रीशियनचे लग्न सरपंच आणि गावातील पंचांच्या उपस्थितीत त्याच्या प्रेयसीसोबत लावून दिले. स्थानिक पोलिस प्रमुख विकास कुमार आझाद यांनी याप्रकरणामध्ये कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे.