
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेकांची इच्छा पूर्ण झाली. पण राजस्थानच्या अलवर येथील प्रद्युम्न सिंह (Pradhuman Singh) यांच्याबाबत माहिती समोर आली आहे.
अलवर : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेकांची इच्छा पूर्ण झाली. पण राजस्थानच्या अलवर येथील प्रद्युम्न सिंह (Pradhuman Singh) यांच्याबाबत माहिती समोर आली आहे. प्रद्युम्न यांनी आयपीएस भाऊ आणि आयएएस वहिनीला पाहून काहीतरी विशेष करण्याचा निर्धार केला.
कानपूरमधून आयआयटी केलेल्या प्रद्युमनने आयएएस होण्याचे ध्येय आयुष्यात बाळगले. त्यानुसार, त्याने खूप प्रयत्नही केले. त्यासाठी त्याने तीनवेळा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले आणि तो प्रशासकीय अधिकारी झाला. पण अधिकारी होण्यापूर्वी त्याने तब्बल एक कोटींची नोकरी सोडली, घर सोडले आणि आता तो अधिकारी होऊनच घरी परतला आहे.
खेरली भागातील रहिवासी
प्रद्युमन हा अलवर जिल्ह्यातील खेरली भागात असलेल्या नांगला गावचा रहिवासी आहे. तो यूपीएससी परीक्षेत 318 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचे वडील मानसिंग यादव हे शाळेत उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पण त्याच्या आईचे शिक्षण झालं नाही. पण तरीही तिने आपल्या दोन्ही मुलांना अधिकारी बनवण्याचा निर्धार केला. आईची इच्छा आणि जिद्द, चिकाटीच्या जोरावर या दोघांनी यश संपादन केले.
एक कोटीची नोकरी सोडली अन्…
प्रद्युम्न खेरलीने अकरावीपर्यंतचे शिक्षण गावातच घेतले आणि नंतर तो दिल्लीला गेला. तिथेच त्याने आपले शिक्षण चालू ठेवले. कानपूरला पोहोचला. आयआयटी केले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्याने आयएएस अधिकारी होण्यासाठी एक कोटींची नोकरी सोडली. तीन वर्षे मेहनत केली. नंतर मात्र त्याने यश संपादित केले.