वेगळ्या विदर्भाची ६ दशकांपासूनची मागणी : प्रशांत किशोर

प्रशांत किशोर यांच्या २० जणांच्या चमूने काही महिन्यांपूर्वी संपूर्ण विदर्भात फिरून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली होती. त्या नंतर मंगळवारी नागपुरात बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी दहा खासदार असलेले विदर्भाचे राज्य लहान नाही तर माेठे राहिल असे सांगितले.

    नागपूर – प्रशांत किशोर यांनी मंगळवारपासून मिशन विदर्भला नागपुरात प्रारंभ केला. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी दिवसभर कार्यकर्ते, विचारवंत, संघटना यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेतली.

    प्रशांत किशोर यांच्या २० जणांच्या चमूने काही महिन्यांपूर्वी संपूर्ण विदर्भात फिरून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली होती. त्या नंतर मंगळवारी नागपुरात बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी दहा खासदार असलेले विदर्भाचे राज्य लहान नाही तर माेठे राहिल असे सांगितले. विदर्भाची चळवळ उभारायची की राजकीय पक्ष स्थापन करायचा याचा निर्णय येथील लोकांनाच घ्यायचा आहे असे ते म्हणाले. वेगळ्या विदर्भ राज्याच्या या बैठकीला प्रशांत किशोर यांनी मिशन ३० हे नाव दिले आहे.

    केवळ छोट्या राज्याची निर्मिती आणि त्यामुळे होणारे फायदे, तोटे एवढ्या मर्यादित उद्देशाने वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे आपण पाहात नाही. विदर्भाचा एक समृद्ध वारसा आहे. एक भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थिती आहे. हे सर्व मुद्दे समजून घेतल्या नंतरच अधिक काही सांगता येईल. वेगळ्या विदर्भाबाबत येथील लोकांच्या काय भावना आहेत, त्यांचे नेमके काय विचार आणि सूचना आहेत, आतापर्यत कोणते प्रयत्न झाले हे समजून आणि ऐकून घ्यायला आलो आहे.