pratibha shukla

‘मुली जर सजून धजून घराबाहेर पडल्या, तर त्यांच्यावर लक्ष ठेवा.वयात आलेल्या मुली अशा प्रकारे घराबाहेर पडल्या तर समजून जा, काहीतरी गडबड आहे’, असा सल्ला प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी दिला आहे.

    लखनौ: ‘मुली जर सजून धजून घराबाहेर पडल्या, तर त्यांच्यावर लक्ष ठेवा.वयात आलेल्या मुली अशा प्रकारे घराबाहेर पडल्या तर समजून जा, काहीतरी गडबड आहे’. हा सल्ला मुलींच्या आयांना दिल्यानं उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) महिला राज्यमंत्री अडचणीत सापडलेल्या आहेत. राष्ट्रीय बालक दिवसाच्या कार्यक्रमात बोलत असताना राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी मुलांबाबतही काळजी घेण्यास सांगितलंय. मुलं जर अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करत असतील, तर तिथंही काहीतरी गडबड आहे, हे समजून जा, असं त्या म्हणाल्यात.

    प्रेम वगैरे काही नाही, विभिन्न लिंगियांना एकमेकांचं आकर्षण
    विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शाळेत असताना अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. प्रेम (Love) वगैरे असं काही नसतं. केवळ विभिन्नलिंगी असलेले एकमेकांच्या प्रती आकर्षित होतात, असंही त्या म्हणाल्या. याबाबत सगळ्या शाळांत शिक्षकांनी मुलांशी खुला संवाद करायला हवा, असा सल्लाही प्रतिभा शुक्ला याांनी दिलाय. मुलं आणि मुली या दोघांनाही सुधरवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही, तोपर्यंत प्रेमाच्या वगैरे भानगडीत पडू नका, असा सल्ला त्यांनी मुलांना दिलाय.

    मोबाईलचा जास्त वापर नुकसानकारक
    मुला-मुलींनी मोबाईलपासून लांब राहण्याचा सल्लाही प्रतिभा शुक्लांनी दिलाय. मोबाईलचा जास्त वापर तुमच्यासाठी नुकसानकारक असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुलांनी सुरक्षित राहण्यासाठी त्यांचं चारित्र्यही स्वच्छ असणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या. प्रेमच करायचं असेल तर ते तुमच्या लक्ष्य आणि उद्दिष्टांवर करा, असंही त्यांनी सांगितलंय. मुलींना सद्यस्थितीत सुरक्षा आणि स्वावलंबनाचे धडे देण्याची गरज असल्याचा मुद्दाही त्यांनी बोलून दाखवला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुलींनी सुरक्षित राहावे ही भावना आहे. मात्र त्याचवेळी मुलींनीही संस्कारित राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या भाषणानंतर प्रतिभा शुक्ला चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यावर टीकाही करण्यात येतेय. त्यांच्या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.पुन्हा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.