७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार संदेश

७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी ७ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दि १४ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, देशवासियांना संबोधित करणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून राष्ट्रपतींचं अभिभाषण प्रसारित केलं जाईल. आकाशवाणीच्या प्रादेशिक केंद्रावरून रात्री साडे नऊ वाजता अभिभाषणाची प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित केला जाईल. राष्ट्रपती भवनाने एका निवेदनात म्हटले आहे की, हे भाषण ऑल इंडिया रेडिओच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर आणि सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर हिंदीमध्ये प्रसारित केला जाईल त्यांनतर इंग्रजीमध्ये अनुवादित केला जाईल.

    दूरदर्शनवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषण प्रसारित केल्यानंतर, दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्या प्रादेशिक भाषांमध्ये भाषण प्रसारित करतील. ऑल इंडिया रेडिओ त्यांच्या संबंधित प्रादेशिक नेटवर्कवर रात्री 9:30 वाजता प्रादेशिक भाषेतील आवृत्ती प्रसारित करेल.