देशाला मिळणार लवकरच नवे राष्ट्रपती, राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

आता लवकरच देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहेत. याबाबत भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होईल आणि २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडेल.

    नवी दिल्ली : आज दिवसभरातील सर्वांत मोठी बातमी समोर येत आहे. राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना, राष्ट्रपती निवडणूक सुद्धा होणार आहे. आता लवकरच देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहेत. याबाबत भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होईल आणि २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडेल. दरम्यान, राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होईल. या निवडणुकीत यंदा एकूण ४,८०९ जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाही, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.

    दरम्यान, राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होईल. संसद आणि विधानसभेत मतदान होईल. राज्यसभेचे महासचिव निवडणूक प्रभारी असतील. कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपणार आहे. गेल्या वेळी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक १७ जुलै २०१७ रोजी झाली होती. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येणार नाही.

    कसा असणार राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम

    नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत- २९ जून
    नामांकन अर्जांची छाननी- ३० जून
    नामांकन परत घेण्याची तारीख- २ जुलै
    मतदान- १८ जुलै
    मतमोजणी- २१ जुलै