पंतप्रधान मोदींनी दिला लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा

अयोध्या शहरातील एका चौकाला गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. याविषयी मोदींनी उल्लेख करत लता दीदी आणि त्यांची रामभक्ती याबद्दल सांगितले. मोदी म्हणाले, दीदी म्हणायच्या माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो. दीदींनी त्यांच्या स्वरांनी साऱ्या जगाला जोडले. अयोध्येतल्या चौकाला लता दीदींचे नाव देण्यात आले आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.

    लखनौ : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या आठवणींना चाहते उजाळा देत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मन की बात (Mann Ki Batt) या कार्यक्रमातून दीदींना आदरांजली (Tributes To Didi) वाहत आठवणींना उजाळा दिला. दीदींचे जाणे हे तमाम भारतीयांच्या काळजाला छेद करुन जाणारी गोष्ट होती. मात्र, त्यांचे सूर हे आपल्या मनात घर करुन आहेत, असे ते म्हणाले.

    अयोध्या (Ayodhya) शहरातील एका चौकाला गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. याविषयी मोदींनी उल्लेख करत लता दीदी आणि त्यांची रामभक्ती याबद्दल सांगितले. ते म्हणाले, दीदी म्हणायच्या माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो. दीदींनी त्यांच्या स्वरांनी साऱ्या जगाला जोडले. अयोध्येतल्या चौकाला लता दीदींचे नाव देण्यात आले आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.

    ज्याठिकाणी लता दीदी चौक आहे त्याठिकाणी आता सांस्कृतिक संबंध आणखी दृढ होतील. लता दीदीच्या नावाने चौक ही आपल्या सर्वांसाठी अभिमानी बाब म्हणावी लागेल. त्यांचे सूर आणि संगीताबद्दलचे विचार आपल्यासोबत राहतील. त्यांची समाजाप्रती असलेली भूमिका, त्यासाठी त्यांनी केलेलं काम हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या कामांचा आदर्श आपण ठेवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

    लता दीदींच्या सुरांनी आपल्याला राममय केले आहे. लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी लता दीदींच्या वेगवेगळ्या आठवणींना शब्दरुप दिले. मला आठवते की, जेव्हा अयोध्येमध्ये राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले तेव्हा मला अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी लता दीदींचा फोन आला होता. अयोध्या चौकातील दीदींचे नाव आणि त्याठिकाणी उभारण्यात आलेली वीणा ही आता सर्वांचे मुख्य आकर्षण असल्याचे मोदींनी सांगितले.