धार्मिक मुद्यावर पंतप्रधान मोदींचा युवकांना सल्ला ; म्हणाले… 

आपण कोणत्या धर्मात वाढलो, यापेक्षा आपल्या महत्त्वाकांक्षा देशाशी कशा जोडल्या जातील, हे महत्त्वाचे असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.        

अलिगढ- अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU) शताब्दी महोत्सवानिमित्त, टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्मायतून पंतप्रधानांनी तरुणांशी संवाद साधला. अलिगढ विद्यापीठात एक भारत-श्रेष्ठ भारत ही भावना मजबूत राहायला हवी, असे मत त्यांनी यावेळी मांडले. आपण कोणत्या धर्मात वाढलो, यापेक्षा आपल्या महत्त्वाकांक्षा देशाशी कशा जोडल्या जातील, हे महत्त्वाचे असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भआषणातील काही महत्त्वाचे मुद्दे
१. शिक्षण सर्व स्तरांपर्यंत बरोबरीने पोहचणे आवश्यक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नव्या शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा ध्यानात घेऊन, धोरण तयार करण्यात आले आहे. आजचा तरुण हा नव्या आव्हानांना सामोरा जातो आहे. युवा वर्गाच्या या प्रेरणांना नव्या शिक्षण धोरणात स्थान देण्यात आले आहे. २०१४ साली देशात १६ आयआयटी होते, आता त्यांची संख्या २३ वर पोहचली आहे, तर सद्यस्थितीत देशात २० आयआयएम सारख्या संस्था असल्याचेही त्यांनी सांगितले.

२. देशाच्या विकासाचे लक्य्ी असावे, मतभेदांना दूर ठेवायला हवे, अलिगढ विद्यापीठाकडे जबरदस्त ताकद आहे. इथे १०० हून अधिक हॉस्टेल्स आहेत. आत्तापर्यंत माहिती नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना शोधण्याचे काम विद्यापीठाने करायला हवे. आत्मनिर्भर भारत योजेनेसाठी विद्यापीठाने काही सूचना कराव्यात, असे मोदीही म्हणाले. वैचारिक मतभेद असू शकतात, पण जेव्हा प्रश्न संपूर्ण देशाच्या लक्ष्याचा असतो, तेव्हा हे मतभेद दू ठेवून देशाच्या  लक्ष्यप्राप्तीसाठी प्रय़त्न व्हायला हवेत. असे कोणतेही ध्येय नाही,. जे आपण एकत्र आल्यास मिळवू शकणार नाही.

३. राजकारण वाट पाहू शकेल, पण विकास वाट पाहू शकणार नाही – आपणा सर्वांना एका समान धाग्याने काम करावे लागेल, त्याचा फायदा देशातील १३० कोटी जनतेला होईल. राजकारण हा समाजाचा मुख्य भाग असला तरी त्याहून अधिक महत्त्वाचे मुद्देही आहेत. राजकारणाच्य् पलिकडे अजून बरेच काही करण्यासारखे आहे. देशातील गरीब, वंचितांसाठी काम करण्याची गरज आहे. गेल्या सरकारांनी मतभेदाच्या नावाखाली खूप वर्ष वाया घालवली आहेत. राजकारण वाट पाहू शकेल, पण विकास वाट पाहू शकणार नाही. आता एकत्रितपणे स्वालंबी भारतासाठी काम करण्याची गरज आहे.

४. मुलींना उच्चशिक्षण देण्यावर जोर – अलिगढ विद्यापीठात मुस्लीम विद्यार्थिनींची संखअया ३५ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. लिंगभेद न होता, सर्वांना समान अधिकार मिळावेत, हे अलिगढ विद्यापीठाच्या स्थापनेपासूनचे ध्येय आहे. एक महिला शिकली तर पूर्ण परिवार शिकतो, असे सांगितले जाते. त्याहून याचा जास्त मोठा अर्थ आहे. महिलांनी शिक्षण घेतल्याने त्यांचे भविष्य सुरक्षित होते. घराला, समाजाला, देशाला नवी दिशा देण्यासाठी मुलींना जास्तीत सजास्त उच्चशिक्षण देण्याची गरज आहे.

५. मुस्लीम मुलींना ड्रापआऊटचा दर ७० टक्क्यांवरुन ३० टक्क्यांवंर – देशात एक वेळ शी स्थइती होती की मुस्लीम मुलींचे शिक्षण सोडण्याचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक होते, ७० वर्षांनंतर या स्थितीत बदल झाला आहे. जो दर ७० टक्के होता, तो आता ३० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. शौचालये नसण्यामुळेही शिक्षण सोडण्याचे प्रमाण धइक होते, पण आता अशी परिस्थिती असणार नाही.

६. अलिगढ विद्यापीठाने AMU नागरिकांना नवा विचार दिला
१०० वर्षांच्या इतिहासात अलिगढ विद्यापीठाने अनेक विद्यार्थ्यांचे जीवन बदवले आहे, त्यांच्या जगणम्याला नवी दिशा दिली आहे. ही मूल्य हीच विद्यापीठाची खरी ओळख आहे. विद्यापीठाचे कुलगपुर सैयदना यांचे एक पत्र मिळाले होते, त्यात त्यांनी कोरोना महामारीला रोखणाऱ्या लसीकरणाच्या कामात मदतीसाठी सहयोग देण्याबाबात विनंती केली होती. अशाच विचारांनी आपण कोरोनावर मात करु शकू. हे विद्यापीठ एका शहरासारखे, मिनी इंडियासारखे आहे. उर्दूसोबतच हिंदी आणि इंग्रजीचे शिक्षणही इथे दिले जाते. कुराणासोबतच, गीता आणि इतर ग्रंथही इथे एकत्र नांदतात. या विद्यापीठातून एक भारत-श्रेष्ठ भारत ही भावना मजबूत होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. देशातील ज्या चांगल्या बाबी आहेत, देशाची जी ताकद आहे, ती घेऊन इथून विद्यार्थी बाहेर पडायला हवेत.

७. धर्मामुळे कुणी मागे राहता कामा नये
ज्याप्रमाणे मानवाचा प्रत्येक अवयव हा निरोगी राहायला हवा, त्याचप्रमाणे समाजाच्या पातळीवरही सर्व स्तरांवर विकास होण्याची गरज आहे. देश त्या दिशेने पुढे वाटचाल करतो आहे. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांबाबत सर्वांनी निश्चिंत असायला हवे. कुणीही धर्माच्या नावाने मागे राहणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत. सर्वांना विकासाच्या सर्व संधी मिळतील. सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास हाच मूलमंत्र आहे. सर्वजण मिळून देशाला नव्या शिखरावर नेऊयात