पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशसाठी रवाना; ढाका विमातळावर उतरल्यावर १९ तोफांची सलामी मिळणार

पंतप्रधान मोदी ढाका विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना १९ तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान एअर पोर्टवर परेडचं निरीक्षण करतील. पुढे दोन्ही देशांचे पंतप्रधान एकसोबत सलामी मंचावर जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी बांगलादेशसाठी रवाना झाले आहेत. यादरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी पंतप्रधान मोदी हे विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. नरेंद्र मोदी यांचं विमान सकाळी साडे दहा वाजता ढाकामधील हजरत शाह जलाल इंटरनॅशनलवर लॅन्ड होईल. तेव्हा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना स्वत: पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित असणार आहेत.

    पंतप्रधान मोदी ढाका विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना १९ तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान एअर पोर्टवर परेडचं निरीक्षण करतील. पुढे दोन्ही देशांचे पंतप्रधान एकसोबत सलामी मंचावर जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी २७ मार्चला बांगलादेशातील गोपालगंज येथे मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्‍मस्‍थळाला तसेच इतर काही तीर्थ स्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांना भेट देणारे पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान असतील.

    कोरोना संकटाच्या काळातही भारताने बांग्लादेशला मोठी मदत केली आहे. भारताने बांग्लादेशला कोरोना लसीचे ९० लाख डोस दिले आहेत. ही मदत इतर कोणत्याही देशाला दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी आणि बांगलादेशच्या ढाका या दोन शहरां दरम्यानच्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.