पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव आणि हेमंत सोरेन येणार एकत्र, कारणही आहे तितकंच महत्त्वाचं, घ्या जाणून…

राष्ट्रीय गंगा परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. प. बंगाल, बिहार, झारखंड, उ. प्रदेश आणि उत्तराखंडचे प्रतिनिधी या परिषदेचे सदस्य आहेत. या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होत असतात. या परिषदेची पहिली बैठक २०१९ साली उ. प्रदेशात कानपूरमध्ये झाली होती.  

    नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहेत. निमित्त आहे राष्ट्रीय गंगा परिषदेचं. या परिषदेची दुसरी बैठक कोलकत्यात होणार आहे. या बैठकीत गंगेसह काही राजकीय विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय गंगा परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. प. बंगाल, बिहार, झारखंड, उ. प्रदेश आणि उत्तराखंडचे प्रतिनिधी या परिषदेचे सदस्य आहेत. या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होत असतात. या परिषदेची पहिली बैठक २०१९ साली उ. प्रदेशात कानपूरमध्ये झाली होती.

    पंतप्रधानांच्या उपस्थितीत बैठक

    राष्ट्रीय स्वच्छ मिशनच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीची माहिती दिली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वता उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत या नेत्यांसह जल शक्ती मंत्रालय, स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्रालय, कृषी कल्याण मंत्रालय, नगर विकास मंत्रालय, नीती आयोगाचे सदस्यही उपस्थित असणार आहेत. गंगेच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या वतीनं मोहीम राबवण्यात येतेय.

    २०२४ निवडणुकांपूर्वी पहिल्यांदाच विरोधी नेत्यांसह पंतप्रधान

    २०२४ च्या लोकसभा निवडमुकांपूर्वी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर राज्यांतील, बिगर भाजपा मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीत दिसणार आहेत. त्यामुळे या बैठकीला वेगळेही संदर्भ आहेत. २०२४ च्या निवडमुकांची तायरी भाजपानंसुरु केलेली आहे.