पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन; वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शुक्रवारी मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाले. मोदींच्या आई हिराबेन मोदी यांच्यावर अहमदाबादमधील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिऑलॉजी अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक खालावली म्हणून त्यांना मंगळवारी रुग्णालयाच उचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाले. मोदींच्या आई हिराबेन मोदी यांच्यावर अहमदाबादमधील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिऑलॉजी अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच ट्विटमध्ये त्यांनी श्रद्धाजंली वाहताना म्हटलं की, “शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है।“ असं ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं आहे. मोदींच्या आईची प्रकृती ठिक व्हावी म्हणून अनेकांना प्रार्थना केली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याशिवाय कफाचाही त्रास जाणवू लागला होता. अहमदाबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, गुरुवारी डॉक्टरांनी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये हिराबेन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटलं होतं. मात्र, आज शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

    गुजरात निवडणुकीपूर्वी 18 जून रोजी मोदींनी त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईची भेट घेतली होती. तसेच गुजरात निवडणुकीच्या मतदानादरम्यान 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांची गांधीनगरमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत बसून चहा प्यायला. तसेच गप्पागोष्टी तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान, त्याआधी यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना आपल्या आईला भेटले होते.