पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुवर्ण विजय मशाल प्रज्ज्वलित, युद्ध स्मारकावर शहीद सैनिकांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi) यांनी १९७१ च्या युद्धात(1971 war) भारताच्या विजयाला ४९ वर्षे झाल्याच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील(national war memorial) अमर ज्योतीने ‘सुवर्ण विजय मशाल’ प्रज्ज्वलित केली.

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi) यांनी १९७१ च्या युद्धात(1971 war) भारताच्या विजयाला ४९ वर्षे झाल्याच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील(national war memorial) अमर ज्योतीने ‘सुवर्ण विजय मशाल’ प्रज्ज्वलित केली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथसिंह, सीडीएस जनरल बिपीन रावत आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. मशाल पेटवण्यापूर्वी पंतप्रधानांनी स्तंभावर पुष्पहार अर्पण करून शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.


पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर सतत पेटत राहणाऱ्या ज्योतीने ४ विजय मशाली प्रज्वलित केल्या आणि त्यांना १९७१ च्या युद्धातील परमवीर चक्र आणि महावीर चक्र विजेत्यांच्या गावांसह देशाच्या विविध भागात रवाना केले. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पदक विजेत्यांच्या गावांसह १९७१ च्या युद्ध स्थळांची माती दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात आणली जाईल.

rajnath singh

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त सुवर्ण विजय वर्षासाठीच्या चिन्हाचे अनावरण केले. उल्लेखनीय आहे की,१६ डिसेंबर हा दिवस भारतात विजय दिन म्हणून साजरा केला जातो. १९७१ मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताने याच दिवशी विजय मिळवून बांगलादेश एक देश म्हणून अस्तित्वात आणला होता.