पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्याचं केलं कौतुक , म्हणाले…

ओम बिर्ला यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसेच सभागृहातील एक फोटो देखील शेअर केला आहे. ओम बिर्ला यांनी शेअर केलेला फोटो सभागृहातील आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी ओम बिर्ला यांचंं अभिनंदन करताना दिसत आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. गेल्या दोन वर्षांत ओम बिर्ला यांनी अशी अनेक पाऊले उचलली आहेत ज्यांनी आपली संसदीय लोकशाही समृद्ध केली आहे आणि उत्पादकता वाढविली आहे. यामुळे अनेक ऐतिहासिक आणि लोक-समर्थित कायदे संमत झाले आहेत. या कामांबद्दल ओम बिर्ला यांचं अभिनंदन. असं मोदी म्हणाले.

    ओम बिर्ला यांनी पहिल्यांदा निवडून आलेले खासदार, युवा खासदार आणि महिला खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी देण्यावर विशेष जोर दिला आहे. आपल्या लोकशाहीमध्ये महत्वाची भूमिका असणार्‍या विविध समित्यांचे त्यांनी बळकटीकरणही केले आहे.

    दरम्यान, ओम बिर्ला यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसेच सभागृहातील एक फोटो देखील शेअर केला आहे. ओम बिर्ला यांनी शेअर केलेला फोटो सभागृहातील आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी ओम बिर्ला यांचंं अभिनंदन करताना दिसत आहेत.