narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi in gujrat) आज गुजरातमध्ये असणार आहेत. कच्छमध्ये अनेक प्रकल्पांचे ते भूमिपूजन(modi to lay foundation of many projects) करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi in Gujarat) आज गुजरातमध्ये असणार आहेत. कच्छमध्ये अनेक प्रकल्पांचे ते भूमिपूजन(modi to lay foundation of many projects) करणार आहेत. या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान जगातील सगळ्यात मोठ्या पर्यायी वीज निर्मिती प्रकल्पाच पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान शेतकरी व कारागिरांशीदेखील मोदी संवाद साधतील, अशी माहिती मिळाली आहे. खवडा येथील जगातील सगळ्यात मोठ्या पर्यायी वीज निर्मिती प्रकल्पाची मोदी पायाभरणी करतील. दुपारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अरबी समुद्र किनाऱ्यावरील मांडवी येथील डिसेलिनेशन प्लांटची  पायाभरणी केली जाणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची उपस्थिती असणार आहे.

हा ३० हजार मेगावॅटचा पर्यायी वीज निर्मिती प्रकल्प जगातील सगळ्यात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. वीजनिर्मितीसाठी पवनचक्क्या व सौर पॅनल यांची या प्रकल्पामध्ये उभारणी केली जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी कच्छ आणि सौराष्ट्र भागातील अन्य चार डिसेलिनेशन प्लांट्सचे व्हर्चुअली भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये कच्छमधील गुंडियाली, देवभूमी द्वारकामधील गंधवी, भावनगरमधील घोघा आणि सोमनाथमधील सुत्रापाडा येथील प्रकल्पांचा समावेश आहे.