‘अग्निपथ’ योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निपथ योजनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये प्रकल्पांच्या लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे अग्नीपथ योजनेवर भाष्य केलं. 'काही निर्णय आणि सुधारणा अनेकांना चांगले वाटणार नाहीत. पण याचा लाभ संपूर्ण देशाला मिळेल' असं मोदी म्हणाले.

    बंगळुरू : केंद्राच्या अग्निपथ योजनेला जोरदार विरोध आहे. बिहारमध्ये या योजनेविरोधात आगडोंब उठला आहे. आंदोलकांनी रेल्वेगाड्या पेटवल्या. या योजनेच्या विरोधात विरोधकांनी पण आंदोलने सुरु केली आहे. काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी या योजनेविरोधात आंदोलने सुरु आहेत. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निपथ योजनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये प्रकल्पांच्या लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे अग्नीपथ योजनेवर भाष्य केलं.

    नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

    पंतप्रधान म्हणाले की, ‘काही निर्णय आणि सुधारणा अनेकांना चांगले वाटणार नाहीत. पण याचा लाभ संपूर्ण देशाला मिळेल’. तसेचं पुढे कर्नाटकच्या प्रकल्पावर नरेंद्र मोदी म्हणाले, ‘दोन इंजिनच्या सरकारने कर्नाटकाच्या विकासावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाचे आपण पुन्हा एकदा साक्षीदार होत आहोत. आज २७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा लोकार्पण आणि पायाभरणी होत आहे. कर्नाटकात पाच राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प आणि ७ रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी आज होत आहे.कोकण रेल्वेच्या शत-प्रतिशत विद्य्युतीकरणाचे आपण साक्षीदार होत आहात. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून कर्नाटकमधील युवा, मध्यम वर्ग, शेतकरी, कष्टकरी , उद्योजकांना नवीन सुविधा आणि नवी संधी उपलब्ध होणार आहे’.

    प्रधानमंत्री पुढे म्हणाले,’ तुम्हाला आश्चर्य वाटेल की, १६ वर्षांपासून या प्रकल्पाच्या फाईल रखडल्या होत्या. आता मला आनंद होत आहे की, डबल इंजिनच्या सरकारने कर्नाटक आणि बंगळुरूमधील जनता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारीला लागली आहे. बंगळुरूमधील जनतेला ट्रॅफिकमुक्त करण्यासाठी कर्नाटक सरकार रेल्वे, रोड, अंडरपास, फ्लायओवर अशा सर्व माध्यमातून काम करत आहे’.