पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या आईचा आज १०० वा वाढदिवस, अहमदबादमध्ये घेतली भेट

पंतप्रधान मोदी यांनी आई हिराबा यांचे पाय धुतले आणि त्यांनी पुष्पहार घालून त्यांच्या चरणांना स्पर्श करत आईचा आशिर्वाद घेतला.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं पंतप्रधान मोदी आईची सदिच्छा भेट घेण्यासाठी गुजरातमध्ये त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले. आईच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती. आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पुजा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.

  विविध कामाचं करणार उदघाटन

  गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ हजार कोटींच्या योजनाचं उद्घान आणि पायाभरणी करण्यात येणार आहे.
  पंतप्रधान मोदी आज सकाळी 9.15 वाजता पावागड टेकडीवरील श्री कालिका मातेच्या पुनर्विकसित मंदिराचं उद्घाटन करतील. त्यानंतर रात्री 11.30 वाजता मोदी हेरिटेज फॉरेस्टलाही भेट देतील. तसेच दुपारी 12:30 वाजता वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी होतील. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

  16 हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी

  आज गुजरात गौरव अभियानादरम्यान पंतप्रधान 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यावेळी फ्रेट कॉरिडॉरचा 357 किमी लांबीचा न्यू पालनपूर-मदार विभागाचं लोकार्पण करण्यात येईल. तसेच, 81 किमी लांबीच्या पालनपूर-मिठा विभागाचे विद्युतीकरण, सोमनाथ, सुरत, उधना आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासाची आणि 166 किमी अहमदाबाद-बोताड विभागाच्या गेज हस्तांतरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे