संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून, अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

संसदेचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून होणार आहे. तर हे अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.  यादरम्यान 23 दिवसांत 17 बैठका होणार आहेत. अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली : राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) 7 डिसेंबरपासून होणार आहे. तर हे अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.  यादरम्यान 23 दिवसांत 17 बैठका होणार आहेत. अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या कामकाजावर तसेच अन्य मुद्द्यांवर चर्चा होईल अशी शक्यता आहे. संसदेचे पहिलेच अधिवेशन असेल ज्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखर हे राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील.

    तर दुसरीकडे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगार, गॅस सिलेडर, पेट्रोल डिझेल आदींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळं विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस  निधन झालेल्या खासदारांच्या स्मरणार्थ हिवाळी तहकूब करण्यात येणार आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा समावेश आहे. या अधिवेशनात कोरोना नियमांचे पालन करावे लागणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.