इंदिरा गांधी भवन पाडून उभारले जाणार नरेंद्र मोदी भवन, गुजरातमध्ये प्रस्तावास मंजुरी

गुजरत पंचायत परिषद बैठकीत गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन तोडून नवी इमारत बनवण्याचा प्रस्ताव आहे. तसेच नव्या इमारतीला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचेही या प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. ही वास्तू जुनी झाली असून ती तोडून नवी इमारत बांधण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.

    गुजरातमधील इंदिरा गांधी भवन तोडून त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदी भवन बनविण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव मंजूर झाला असून मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांनी संमती दिल्यानंतर या इमारतीचे काम सुरू होईल. १९८३ साली ही इमारत बांधण्यात आली होती. तेव्हा राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या इमारतीचे भूमीपूजन केले होते, म्हणून त्यांचे नाव या इमारतीला देण्यात आले होते.

    काय आहे प्रस्तवात

    गुजरत पंचायत परिषद बैठकीत गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन तोडून नवी इमारत बनवण्याचा प्रस्ताव आहे. तसेच नव्या इमारतीला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचेही या प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. ही वास्तू जुनी झाली असून ती तोडून नवी इमारत बांधण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर या प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री पटेल यावर आता निर्णय घेणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही या प्रस्तावाबद्दल सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या प्रस्तावाबद्दल माहिती दिल्यानंतर परिषदेचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदीं यांचीही भेट घेणार आहेत.

     

    काँग्रेसचा आक्षेप

    या प्रस्तावावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून या निर्णयाचा विरोध केला आहे. या प्रकरणी गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी ट्विट करून या प्रस्तावावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. नवीन काही घडवले नाही, बनवलेले विकून टाकले आणि जे विकता नाही आले त्याचेनावे बदलली जात आहेत असे मोढवाडिया यांनी म्हट्ले आहे. तसेच सरदार पटेल स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले. आता इंदिरा गांधी पंचायती राज संस्थेचे नाव बदलून नरेंद्र मोदी केले जाईल असेही मोढवाढिया म्हणाले. भाजप नेत्यांच्या मनात राष्ट्री नेत्यांविरोधात फक्त द्वेष भरलेला आहे असेही मोढवाढिया यांनी नमूद केले आहे.