protest against agneepath scheme

राजस्थानमध्ये (Rajasthan) अग्निपथ योजनेला विरोध केला जात आहे. (Agneepath Recruitment Scheme) राज्यस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तरुण अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करत आहेत. जयपूर, जोधपूर, अजमेर अलवरसह सहा जिल्ह्यांमध्ये हिंसक निदर्शने (Violent Demonstrations) होत आहेत.

    अलवर : अग्निपथ योजनेचा (Agneepath Scheme) विरोध सगळ्यात आधी बिहारमध्ये सुरू झाला. तो आता  देशातील १३ राज्यांमध्ये पोहोचला आहे. या आंदोलनाची सर्वाधिक झळ ही बिहार, उत्तर प्रदेशला बसली असून आंदोलक युवकांनी सरकारी संपत्तीचं मोठं नुकसान केले आहे. राजस्थानमध्येही (Rajasthan) अग्निपथ योजनेला विरोध केला जात आहे.  राज्यस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तरुण अग्निपथ योजनेच्या विरोधात (Agneepath Recruitment Scheme) आंदोलन करत आहेत. जयपूर, जोधपूर, अजमेर अलवरसह सहा जिल्ह्यांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर शहरातील बेनाड रेल्वे स्थानकाची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचवेळी भरतपूरमध्ये रोडवेजच्या बसेस बंद करण्यात आल्या. बिहारमध्ये झालेल्या निदर्शनामुळे कोटा-पाटणा एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.

    शनिवारी अलवर जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात झाली. बेहरोरमध्ये लष्कराच्या तयारीत असलेल्या तरुणांनी जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग जाम केला. पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी दगडफेक सुरू केली. या आंदोलनामुळे आंदोलकांची याठिकाणी तैनात पोलिसांशी झटापटही झाली. सुमारे तासभर महामार्ग ठप्प झाला होता.

    महामार्गाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. झुंझुनू जिल्ह्यातही आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे. येथील चिरावा शहरात पोलिसांची आंदोलकांशी झटापट झाली. तर आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक अडवण्याचा प्रयत्न झाला. सांगानेर, जयपूरमध्ये तरुणांनी रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. येथील बेनाड रेल्वे स्थानकात दुपारी मोठ्या संख्येने तरुणांनी अचानक घुसून तोडफोड केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तेथून तरुणांचा पाठलाग केला असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी जोधपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.