डाळीच्या दराने गाठला उच्चांक; आयात वाढविण्यासाठी केंद्राने आखला ‘प्लॅन’

टोमॅटो, कांद्याच्या दरानंतर आता डाळीने (Pulse Rate) सुद्धा उच्चांक गाठला आहे. अरहर, उडीद डाळीनंतर चनाडाळीचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहे. दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने आयात वाढविण्याची रणनीती आखली असल्याची माहिती आहे.

  नवी दिल्ली : टोमॅटो, कांद्याच्या दरानंतर आता डाळीने (Pulse Rate) सुद्धा उच्चांक गाठला आहे. अरहर, उडीद डाळीनंतर चनाडाळीचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहे. दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने आयात वाढविण्याची रणनीती आखली असल्याची माहिती आहे. इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे (आयपीजीए) अध्यक्ष बिमल कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, इंदूरमध्ये 30 जून रोजी हरभऱ्याची (बंगाल हरभरा) मॉडेल किंमत 4,785 रुपये प्रति क्विंटल होती. पण ऑगस्टपर्यंत त्याच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  मान्सूनला झालेला विलंब, बाजारातून वाढलेली मागणी याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. कांदा, टोमॅटो, तांदूळ, गहू, हिरव्या भाज्यांशिवाय डाळीचे दर गगनाला भिडत असल्याने महागाईत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्वीच डाळीचे दर चढे होते. पावसाला विलंब झाल्यानंतर भावात आणखी वाढ नोंदविण्यात आली आहे. किरकोळ महागाईची स्थिती अशी आहे की, अरहर आणि उडीद डाळीनंतर आता चणाडाळही महाग झाली आहे.

  मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा

  जूनपर्यंत चणाडाळीची किमान आधारभूत किंमत 5,335 रुपये प्रति क्विंटलच्या खाली होती. मात्र, आता अनेक बाजारात भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक आहे. गेल्या एका महिन्यात किमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 21 जुलै रोजी दिल्लीत चनाडाळ 72 रुपये किलोने विकली जात होती. मात्र, आता त्याची किंमत आठ रुपयांनी पुरवठा अपुरा आहे.

  पिठापासून गव्हापर्यंत अनेक वस्तू महागल्या

  गव्हाच्या दरातील वाढ थांबण्याचे नाव घेत नाही. देशातील गव्हाच्या किमतीने सहा महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. आगामी सणासुदीचा हंगाम आणि मागणी वाढल्याने गव्हाचे भाव वाढले आहे. गव्हाच्या वाढली आहे. म्हणजेच आता दिल्लीत एक किलो हरभरा डाळीची किंमत 80 रुपये झाली आहे. ऑगस्ट महिन्यात चणाडाळीची किंमत 7,765 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचली. सध्या देशात तूर आणि उडदाचा मोठा तुटवडा असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याचा परिणाम इतर डाळींवरही होत आहे. त्यामुळे भाव वाढत आहेत.