ठरलं ‘हे’ होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री, हरिश रावत यांची ट्विटरच्या माध्यमातून केले जाहीर

पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटण्याची चिन्हे आता दिसत आहेत. नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड यांची नावे मागे पडल्यानंतर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीदासाठी नकार दिला आहे. त्यामुळे सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी बैठक घेतली असून कोणत्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.यात चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर एकमत झालं आहे.

  काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी चरणजीत सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत (Harish Rawat)यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.(CharanjitSinghChanni has been elected as the Leader of the Congress Legislature Party of Punjab.)

  काय म्हणाले रावत?

  पंजाब विधिमंडळात काँग्रेसचे नेते म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर एकमत झालं आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे, असं रावत यांनी म्हटलं आहे.

  पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटण्याची चिन्हे आता दिसत आहेत. नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड यांची नावे मागे पडल्यानंतर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीदासाठी नकार दिला आहे. त्यामुळे सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी बैठक घेतली असून कोणत्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.यात चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर एकमत झालं आहे.

  शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सुनील जाखड, सुखजिंदर सिंह रंधावा, नवज्योत सिंग सिद्धू, प्रताप सिंह बाजवा यांची नावं चर्चेत होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि पंजाबमधील काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर झालेल्या बैठकांमध्ये चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.चन्नी यांच्या नियुक्तीसह पंजाबला पहिल्यांदाच दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मुख्यमंत्री लाभणार आहे.