
सायलेंट किलर अशी ओळख असलेली ‘वागीर’ नौदलात (Vagir Submrine) सामील झाल्यानं भारताला चांगलाच फायदा होणार आहे. या पाणबुडीनं चिनी (China) सैन्याचा मनात धडकी भरणार आहे. कशी आहे ही वागीर (INS Vagir) पाणबुडी आणि काय आहेत तिची वैशिष्ठ्य यावर एक नजर टाकूयात.
नवी दिल्ली: समुद्रात भारताची ताकद वाढवणारी ‘वागीर’ (INS Vagir) ही पाणबुडी सोमवारच्या मुहुर्तावर भारतीय नौदलात (Indian Navy) दाखल झाली आहे. हिंद महासागरात गेल्या काही दिवसांपासून चिनी नौदलाची उपस्थिती वाढते आहे. अशा स्थितीत सायलेंट किलर अशी ओळख असलेली ‘वागीर’ नौदलात (Vagir Submrine) सामील झाल्यानं भारताला चांगलाच फायदा होणार आहे. या पाणबुडीनं चिनी (China) सैन्याचा मनात धडकी भरणार आहे. कशी आहे ही वागीर पाणबुडी आणि काय आहेत तिची वैशिष्ठ्य यावर एक नजर टाकूयात.
1. वागीर पाणबुडी चिनी सैन्याला मात देण्यासाठी अत्यंत सक्षम असल्याचं मानण्यात येतंय. प्रोजेक्ट-75 अंतर्गत स्कॉर्पियन प्रोगामद्वारा या पाणबुडीची निर्मिती करण्यात आलीय. अशा सहा पाणबुड्या निर्माण करण्यात येत आहेत. त्यातील पाचवी पाणबुडी ही वागीर आहे. यापूर्वी कलवरी, खंडेरी, करंज आणि वेला या पाणबुड्या नौदलात सामील झालेल्या आहेत. वागीरनंतर तयार होणाऱ्या पाणबुडीचं नाव आहे वागशीर.
2. वागीर पाणबुडी अत्याधुनिक स्टील्थ फिचरनं युक्त आहे. पाणबुडीतून निघणाऱ्या आवाजावर मर्यादा, लो रेडिएशन नॉईज लेव्हल आणि हायड्रो डायनॅमिक आकाराची ही पाणबुडी आहे. ही पाणबुडी समुद्रातून जात असताना पाण्यात किंवा किनाऱ्यावर जराशीही कल्पना येणार नाही, अशी याची रचना करण्यात आलीय. एखाद्या शत्रुच्या पाणबुडीवर, नौकेवर एन्टीशिप मिसाईलद्वारे ही पाणबुडी सहज हल्ला करु शकेल, त्यामुळे तिला सायलेंट किलर असंही संबोधण्यात येतंय.
3. वागीर पाणबुडी पाण्याच्या आतून सहज शत्रूपर्यंत पोहचू शकणार आहे. तसंच हल्लाही करु शकणार आहे. याचा उपयोग अनेक ऑपरेशन्समध्ये होईल, अशी शक्यता आहे. शत्रूंच्या परिसरात जाऊन गुप्तहेर म्हणून, माहिती गोळा करण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. शत्रूची पाणबुडी किंवा युद्धनौका नष्ट करण्यासाठी भुसुरंग पेरण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. या पाणबुडीवर लांब अंतरावर मारा करु शकणारे क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आलेले आहे.
4. शत्रूराष्ट्राची पाणबुडी आणि युद्धनौका ओळखण्यासाठी या पाणबुडीत स्टेट ऑफ द आर्ट सोनर आणि सेन्सॉर सुट लावण्यात आलेत. जुन्या वागीरला 1 नोव्हेंबर 1973 साली नौदलात सामील करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 वर्ष या पाणबुडीनं देशाची सेवा केली होती. त्या पाणबुडीला 2001 साली निवृत्ती देण्यात आली.
5. वागीर ही पाणबुडी डिझेल इंजिनवर कार्यरत असेल. या इंजिनापासून तयार होणाऱ्या वीजेपासून पाणबुडीतील बॅटऱ्याही चार्ज करण्यात येणार आहेत. पाण्यात लपून राहण्यासाठी यांचा वापर करण्यात येईल. वागीरची निर्मिती माझगाव डॉकमध्ये फ्रान्स आणि भारतीय कंपनीच्या संयुक्त भागिदारीत करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत नौदलात सामील होणारी ही तिसरी पाणबुडी आहे.