congress leader tariq anwar advised to congress accept the truth on bihar assembly election 2020 defeat

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे. परंतु ऐन वर्धापन दिनीच काँग्रेस खासदार राहुल गांधी इटलीला रवाना झाले. त्यांच्या या परदेश दौऱ्यावर भाजप नेत्यांकडून खिल्ली उडवली जात असतानाच आता राहुल गांधी यांच्या इटली दौऱ्याचे खरे कारण समोर आले आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांनी राहुल गांधीच्या इटली दौऱ्यामागचं कारण सांगितलं आहे.

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे. परंतु ऐन वर्धापन दिनीच काँग्रेस खासदार राहुल गांधी इटलीला रवाना झाले. त्यांच्या या परदेश दौऱ्यावर भाजप नेत्यांकडून खिल्ली उडवली जात असतानाच आता राहुल गांधी यांच्या इटली दौऱ्याचे खरे कारण समोर आले आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांनी राहुल गांधीच्या इटली दौऱ्यामागचं कारण सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, “जर आपल्या घऱातलं कोणी आजारी असेल तर कोणीही जाणार…राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते गेले आहेत”.

“गेल्या सहा वर्षापासून पंतप्रधान एकही पत्रकार परिषद घेण्यास तयार नाहीत. त्यावर तर कोणी बोलत नाही.मोदींनी गेल्या सहा वर्षात अर्थव्यवस्थेची वाट लावली. लाखो शेतकरी रस्त्यावर बसले आहेत त्याबद्दल एक शब्द तुम्ही बोलत नाही. लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात त्याची चर्चा करायला तयार नाही देशासमोरच्या महत्वाच्या प्रश्नांना मोदी सरकारने कधी उत्तर दिलं नाही ही महत्वाची बाब आहे. मात्र असे असतानाही प्रश्न केवळ राहुल गांधी यांनाच विचारले जातात. राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यातच करोनाचं भयंकर मोठं संकट येणार असल्याचं सांगितलं होतं. सरकारने लक्ष दिलं नाही. लाखो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असताना सरकार लक्ष द्यायला तयार आहे का? . आणि त्यावर ज्या एकमेव नेत्याने संघर्ष केला आहे ते म्हणजे राहुल गांधी आहेत,” असं ते म्हणाले.