राहुल अध्यक्ष व्हावेत; १७ ऑक्टोबर रोजी होणार निवडणूक

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडली. बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.

    नवी दिल्ली – राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, बिहार आणि तामिळनाडूनंतर आता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करण्याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना २३ सप्टेंबर रोजी जारी केली जाईल, तर निवडणूक १७ ऑक्टोबरला प्रस्तावित आहे. मात्र, पक्षात अद्याप एकाही नावावर एकमत झालेले नाही.

    आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडली. बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. नंतर सर्व प्रतिनिधींनी एकमताने हा ठराव मंजूर केला.

    दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना २३ सप्टेंबर रोजी जारी केली जाणार आहे. तर निवडणूक १७ ऑक्टोबरला प्रस्तावित आहे. मात्र, काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत अद्याप एकाही नावावर एकमत झालेले नाही.

    आज महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. सर्व प्रदेश प्रतिनिधींनी हा ठराव एकमताने मंजूर केला. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची बैठक माजी केंद्रीय मंत्री श्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.