ईडी कार्यलयात पोहोचले राहुल गांधी, कार्यलयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांच आंदोलन

सोनिया गांधी यांनाही ईडीनं समन्स बजावलं आहे. पण, कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी मुदत वाढवून मागितली आहे.

    काँग्रेस नेते राहुल गांधी ईडी कार्यलयात पोहचले आहेत. त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी थोड्याच वेळात ते ईडीसमोर हजर राहणार. ईडी कार्यलयाबाहेर काँग्रेस कार्यकर्तेनी आंदोलन सुरु केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस मुख्यालयच्या बाहेर पोलिसांना बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

    ईडी मुख्यालयाबाहेर ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांच विरोध प्रदर्शन सुरू आहे. त्या कार्यकर्त्यांना पोलीस पळवून लावत आहेत. तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतल्याची माहिती आहे. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर ‘सत्य झुकेगा नही’! असं लिहलं आहे.

    तर, सोनिया गांधी यांनाही ईडीनं समन्स बजावलं आहे. पण, कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी मुदत वाढवून मागितली आहे.