‘लोकशाही चालवण्याची ही पद्धत आहे का ?’ राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi On MP Suspension)यांनी दिल्लीत खासदारांच्या निलंबनाच्या विषयावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

    संसदेच्या अधिवेशनात(Parliament Session) खासदारांच्या निलंबनावरून(12 Rajyasabha Mps Suspended) पुन्हा एकदा गदारोळ झाल्याचे दिसून आलं. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi On MP Suspension)यांनी दिल्लीत खासदारांच्या निलंबनाच्या विषयावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

    राहुल गांधी म्हणाले, “आज आमचे जे विरोधी पक्षांचे निलंबित खासदार आहेत. त्यांचे १४ दिवस निलंबनाचे झाले आहेत. सभागृहात ज्या गोष्टींबद्दल विरोधक चर्चा करू इच्छित आहे, ती चर्चा सरकार होऊ देत नाही आणि जेथे पण विरोधक आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न करते, तिथे धमकावून, भीती दाखवून त्यांना निलंबित करून सरकार काम करत आहे, ही लोकशाहीची हत्या आहे. संसद सभागृहात चर्चा झाली पाहिजे सर्व मुद्द्य्यांवर चर्चा व्हायला हवी. परंतु जी चर्चा आम्ही करू इच्छित आहोत. ते आम्हाला करू दिलं जात नाही. सरकारवर आम्ही प्रश्न उपस्थित करायचं म्हटलं तर सरकार प्रश्न उपस्थित करू देत नाही.”


    तसेच, “तीन-चार असे मुद्दे आहेत, जे की सरकार त्यांचं नाव देखील काढू देत नाही. ही योग्य पद्धत नाही. पंतप्रधान सभागृहात येत नाहीत. १३ दिवस झाले पंतप्रधान आले नाही. ही काही लोकशाही चालवण्याची पद्धत नाही.” असंही यावेळी राहुल गांधी यांनी बोलून दाखवलं.

    दरम्यान आज राज्यसभेच्या १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद ते विजय चौकापर्यंत मोर्चा देखील काढला.