राहुल गांधींच ठरलंय, आता RSS ला संघ परिवार म्हणणार नाही – कारण जाणून घ्या

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये(rahuj gandhi tweet) म्हटले आहे की, माझ्या मते आरएसएस(RSS) आणि त्याच्याशी संबंधित संघटनांना संघ परिवार(sangh pariwar) म्हणणं योग्य नाही. कारण परिवारात महिलासुद्धा असतात. वयस्कर माणसांचा सन्मान होत असतो. करुणा आणि प्रेमाची भावना असते. यातलं काहीच आरएसएसमध्ये दिसत नाही.

    राहुल गांधी यांनी आज संघाविषयी एक ट्विट(rahul gandhi tweet about RSS)केले आहे.ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या मते आरएसएस आणि त्याच्याशी संबंधित संघटनांना संघ परिवार म्हणणं योग्य नाही. कारण परिवारात महिलासुद्धा असतात. वयस्कर माणसांचा सन्मान होत असतो. करुणा आणि प्रेमाची भावना असते.यातलं काहीच आरएसएसमध्ये दिसत नाही.

    राहुल गांधी नेहमीच भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका करत असतात. आता ते आरएसएसवरही निशाणा साधताना दिसत आहेत. याआधी राहुल गांधी यांनी पोलिसांचे बळ वाढवणाऱ्या एका विधेयकावरून बिहार विधानसभेत झालेल्या गदारोळावर मुख्यमंत्री नीतीश कुमार आरएसएस आणि भाजपामय असल्याची टीका केली होती.

    राहुल गांधी यांनी म्हटले होते की बिहार विधानसभेतील घटनेवरून हे स्पष्ट होते की मुख्यमंत्री नीतीशकुमार पुर्णपणे आरएसएस आणि भाजपामय झाले आहेत. लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना सरकार म्हणणे चुकीचे आहे. विरोधी पक्ष शांत बसणार नाही. आम्ही कोणालाही घाबरत नाही.

    राहुल गांधींनी आज संघ परिवारावर थेट टीका केली आहे.