राहुल गांधी चौथ्या फेरीच्या चौकशीसाठी ईडीसमोर होणार हजर

बुधवारी ईडीची चौकशी संपल्यानंतर राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. ( Sonia Gandhi Health ) त्यांनी आपल्या आई सोनीया यांची विचारपूस केली. दरम्यान, ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांनाही 23 जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

    नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौथ्या फेरीच्या चौकशीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधींची सोमवारी (आज) अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होत आहेत. त्यांच्या चौकशीचा पक्ष देशभरात शांततापूर्ण आंदोलन करुन निषेध करणार आहे. केंद्र सरकारचे हे ‘सूडाचे राजकारण’ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.

    पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या तीव्र निषेधादरम्यान खासदार राहुल गांधी यांची ईडीने 13 ते 15 जून दरम्यान चौकशी केली. विशेष म्हणजे, ईडीने गांधींना शुक्रवारी (17 जून) पुन्हा हजर राहण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी अधिका-यांना हजर राहण्यापासून सूट देण्याची विनंती केली आणि सोमवारी (20 जून) नवीन तारखेची विनंती केली.काँग्रेस अध्यक्ष सोनीया गांधी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आजारी आहेत. सध्या त्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत.

    बुधवारी ईडीची चौकशी संपल्यानंतर राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. ( Sonia Gandhi Health ) त्यांनी आपल्या आई सोनीया यांची विचारपूस केली. दरम्यान, ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांनाही 23 जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्या हजर राहतील की नाही याबद्दल तुर्तास काही ठोस माहिती उपलब्ध नाही.